- Marathi News
- सिटी क्राईम
- आकाश इन्स्टिट्यूटच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याने विष घेतले; मराठा आंदोलकांनी क्लासेसची तोडफोड केल...
आकाश इन्स्टिट्यूटच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याने विष घेतले; मराठा आंदोलकांनी क्लासेसची तोडफोड केली!
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बीडच्या माजलगाव येथील सुदर्शन दत्तात्रय तौर या तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्याने ५८ हजार रुपये शुल्क भरले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने आठ दिवसांतच हा क्लास सोडला आणि शुल्क परत मागितले. मात्र क्लासचालकाने परत देण्यास नकार दिल्याची सुसाइड नोट लिहून त्याने माजलगाव येथे राहत्या घरी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बीडच्या माजलगाव येथील सुदर्शन दत्तात्रय तौर या तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्याने ५८ हजार रुपये शुल्क भरले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने आठ दिवसांतच हा क्लास सोडला आणि शुल्क परत मागितले. मात्र क्लासचालकाने परत देण्यास नकार दिल्याची सुसाइड नोट लिहून त्याने माजलगाव येथे राहत्या घरी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तो बचावला, आता त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे संतापलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गुरुवारी (१२ सप्टेंबर)आकाश इन्स्टिट्यूटमध्ये घुसून तोडफोड केली. दरम्यान, तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दंगलीचा तर क्लासच्या व्यवस्थापनाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाशवाणी चौकातील आकाश इन्स्टिट्यूटबद्दल विद्यार्थ्यांच्या पैशांसाठी छळवणूक होत असल्याच्या तक्रारी असतात. आता एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर क्लासेसने सारवासारव केली आहे. रिफंड पॉलिसीनुसार १५ हजार परत देण्यास तयार होतो. ५ सप्टेंबरला आरटीजीएसने २९,८०७ रुपये पाठवले. चुकीच्या क्रमांकामुळे ते पोहोचले नाहीत, असे क्लासेस संचालक मंगेश आस्वार यांनी म्हटले आहे. ५८ हजार रुपये भरले असता सुरुवातीला १५ हजार आणि नंतर २९ हजार रुपये पाठवण्याचा प्रयत्न केल्याचे संचालक आस्वार म्हणत आहेत. यातूनच विद्यार्थ्याला झालेला मनस्ताप लक्षात येतो.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 13:24:52
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?