छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिंताग्रस्त, भयग्रस्त, दुःखी चेहऱ्यांवर हास्य परत आणण्याची किमया साधली जात आहे. ही सकारात्मक गोष्ट लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेमुळे शक्य होत असून, दर आठवड्याला शनिवार, रविवार छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या कार्यशाळेला विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत कुतूहलजनक आहेत. त्यांच्या आयुष्यात झालेला बदल सांगताना त्यांना आनंद आवरता येत नसल्याचे दिसून येते.
मन एकाग्र होत नाही, स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव, सतत राग व चिडचिडेपणा, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नाही, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश अशा एक ना अनेक समस्यांवर लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांची कार्यशाळा रामबाण ठरत आहे. मन की शक्तीयोंका महासेमिनीर (POWER OF SUBCONSCIOUS MIND) हा संमोहनशास्त्र व स्मरणशक्ती विकास कार्यशाळा या आठवड्यात तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी (१४ सप्टेंबर) व रविवारी (१५ सप्टेंबर) या दोन्ही दिवशी सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. कार्यशाळेसाठी प्रवेश मोफत असून नावनोंदणी अनिवार्य आहे. नाव नोंदणीसाठी 8087492943 किंवा 9850170936 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यशाळेबद्दल सुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी सांगितले, की मानसिक क्षमतांचा विकास अत्यंत महत्वाचा आहे. स्पर्धात्मक युगात आपण आपल्या पाल्यांच्या मानसिक क्षमतांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. धैर्य, हिंमत, चिकाटी, स्टेज डेअरिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्टडी मॅनेजमेंट, हॅबिट मॅनेजमेंटअभावी अनेक मुले आज संपूर्ण मानसिकता बिघडून बसत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. त्यांना नवे आयुष्य प्रदान करणारा, त्यांच्या मानसिक क्षमत विकासित करणारा करणारा सुपर माईंड पॅावर कार्यक्रम आहे.