वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी मैदानात उतरलेल्या ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदेश यात्रेला वैजापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एससी, एसटी, ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आरक्षणवादी उमेदवारांनाच विधानसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यात्रेच्या तालुक्यातील समारोपावेळी केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, की अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांना आरक्षण हे त्यांच्या परिस्थितीनुरूप मिळाले आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष आरक्षणाचे मारेकरी असून त्यांना काहीही करून आरक्षण संपवायचे आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. ॲड. आंबेडकर यांची अहिल्या संदेश यात्रा १० दिवस वैजापूर तालुक्यातील ७० गावांत फिरली. यात्रेला तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेचा तालुक्यातील समारोप बुधवारी (११ सप्टेंबर) झाला. प्रास्ताविक बाळासाहेब जानराव, सुनील गायकवाड यांनी केले. (ॲड. आंबेडकर यांच्या भाषणाचा पूर्ण व्हिडीओ पहा पुढील लिंकवर क्लिक करून : https://fb.watch/uymMUZarRO/ )