- Marathi News
- जिल्हा न्यूज
- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराजाची कुटीच जाळून टाकली!; हतनूरची घटना
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराजाची कुटीच जाळून टाकली!; हतनूरची घटना
On
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या दादा महाराज अकोलकर ऊर्फ बाबा (वय ६७) याच्या हतनूर (ता. कन्नड) येथील वादग्रस्त माऊली वारकरी कन्या आश्रमातील कुटी कुणीतरी जाळून टाकल्याची घटना बुधवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या कुटीतच त्याने १३ वर्षीय मुलीला धमकी देत बलात्कार केला होता. दुसऱ्या एका १४ वर्षीय मुलीवरही बलात्काराचा […]
कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या दादा महाराज अकोलकर ऊर्फ बाबा (वय ६७) याच्या हतनूर (ता. कन्नड) येथील वादग्रस्त माऊली वारकरी कन्या आश्रमातील कुटी कुणीतरी जाळून टाकल्याची घटना बुधवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या कुटीतच त्याने १३ वर्षीय मुलीला धमकी देत बलात्कार केला होता. दुसऱ्या एका १४ वर्षीय मुलीवरही बलात्काराचा प्रयत्नही केला होता.
अकोलकरच्या माऊली वारकरी कन्या आश्रमात धार्मिक व शालेय शिक्षण घेण्यासाठी १५ मुली राहत होत्या. त्या १३ ते १८ वयोगटातील होत्या. यातीलच एका १३ वर्षीय विद्यार्थिनीकडून सुरुवातीला पाय दाबून घ्यायचा. सर्व मुली झाेपेत असताना २० ऑगस्टला रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास त्याने मुलीला झोपेतून उठवून बोलावले. तिला पाय दाबण्यास सांगितले. ती पाय दाबत असतानाच त्याने बलात्कार केला. याबाबत कुणाला काही सांगितले तर शिक्षण देणार नाही, अशी धमकी त्याने दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...