गॅस सिलिंडरचा भडका; घराला भीषण आग, सुदैवाने जिवीत हानी टळली, संसार खाक, पंढरपुरातील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्वयंपाक करताना अचानक गॅस सिलिंडरचा भडका झाला. यामुळे घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून गेले. ही घटना बुधवारी (११ सप्‍टेंबर) दुपारी बाराला वाळूज एमआयडीसीतील छोट्या पंढरपूरमध्ये घडली. नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. अर्चना केरे यांच्या घरात रूम किरायाने घेऊन कृष्णा ग्यानबा परतुरे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्वयंपाक करताना अचानक गॅस सिलिंडरचा भडका झाला. यामुळे घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून गेले. ही घटना बुधवारी (११ सप्‍टेंबर) दुपारी बाराला वाळूज एमआयडीसीतील छोट्या पंढरपूरमध्ये घडली.

नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. अर्चना केरे यांच्या घरात रूम किरायाने घेऊन कृष्णा ग्यानबा परतुरे राहतात. बुधवारी सकाळी त्यांनी नवीन सिलिंडर आणले. स्वयंपाक करत असतानाच अचानक सिलिंडरला आग लागली. कृष्णा यांनी प्रसंगावधान राखून घराबाहेर पडले. आरडा-ओरडा सुरू केली. शेजाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररुप धारण करत कपडे व साहित्य पेटले. वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आग आटोक्‍यात आणली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software