- Marathi News
- पॉलिटिक्स
- मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या राजश्रीताई उंबरेंची प्रकृती खालावली
मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या राजश्रीताई उंबरेंची प्रकृती खालावली
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या सहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राजश्रीताई उंबरे क्रांती चौकात उपोषणाला बसल्या आहेत. आज, ७ सप्टेंबरला त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी उपोषणस्थळी धावले. त्यांनी उपचार घेण्याची विनंती केली. त्यांची विनंती राजश्रीताईंनी मान्य करत पाणी पिले व सलाईन लावून घेतली, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या सहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राजश्रीताई उंबरे क्रांती चौकात उपोषणाला बसल्या आहेत. आज, ७ सप्टेंबरला त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी उपोषणस्थळी धावले. त्यांनी उपचार घेण्याची विनंती केली. त्यांची विनंती राजश्रीताईंनी मान्य करत पाणी पिले व सलाईन लावून घेतली, मात्र उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन राजश्रीताई उंबरे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी उपोषण हा एक मार्ग असला तरीही दुसऱ्या मार्गाने आपण हा लढा जिंकू शकतो. समाजाच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असल्याने आपल्या जीवाची काळजी घेऊन आपल्याला हा लढा जिंकावा लागेल, अशी विनवणी करत आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. या वेळी शिवसेना शहर संघटक सचिन तायडे, बाळराजे आवारे, किशोर चव्हाण व हिमानी मोहोड उपस्थित होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...