छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मानवी दुःख, नैराश्यासह अडचणींवर प्रभावी फुंकर घालणाऱ्या संमोहनशास्त्राचे अनेक अचंबित करणारे पदर लाइफ कोच एस. के. नांदेडकर यांनी उलगडले अन् उपस्थित सहभागी नागरिक, विद्यार्थी थक्कच झाले… शुक्रवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान ही कार्यशाळा तापडिया नाट्यमंदिरात पार पडली. कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. आता उद्या, ८ सप्टेंबरलाही सायंकाळी सात ते नऊ दरम्यान कार्यशाळा होणार असून, या कार्यशाळेच्या नावनोंदणीला भक्कम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. कार्यशाळेत प्रवेश मोफत असून सहभागी होण्यासाठी आधी नाव नोंदणी अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी 8087492943 किंवा 9850170936 या नंबरवर संपर्क करावा.
मन की शक्तीयोंका महासेमिनार छत्रपती संभाजीनगरच्या हजारो नागरिकांना वेदनांतून मुक्त करणारा ठरत आहे. उच्चपदस्थ व्यक्तींपासून शालेय विद्यार्थ्यांना ही कार्यशाळा लाभदायी ठरत आहे. महिला, युवतींचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. दीर्घकाळापासून जडलेल्या दुखण्याला संमोहनशास्त्राने नष्ट करण्याची किमया अनुभवताना अनेक रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासारख्या असतात.
सुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ एस. के. नांदेडकर यांनी सांगितले, की मानसिक क्षमतांचा विकास अत्यंत महत्वाचा आहे. स्पर्धात्मक युगात आपण आपल्या पाल्यांच्या मानसिक क्षमतांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. धैर्य, हिंमत, चिकाटी, स्टेज डेअरिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्टडी मॅनेजमेंट, हॅबिट मॅनेजमेंटअभावी अनेक मुले आज संपूर्ण मानसिकता बिघडून बसत आहेत. व्यसनाधीन होत आहेत. त्यांना नवे आयुष्य प्रदान करणारा, त्यांच्या मानसिक क्षमत विकासित करणारा करणारा सुपर माईंड पॅावर कार्यक्रम आहे.
या समस्या होतात दूर…
मन एकाग्र होत नाही, स्मरण शक्ती व आत्मविश्वासाचा अभाव, सतत राग व चिडचिडेपणा, नकारात्मक, नको ते विचार सतावतात, परीक्षा, इंटरव्ह्यू, सेमिनार, ओरलची भीती, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती, मानवी स्नेह संबंध जमत नाही, डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, घरात अशांती, नोकरी तसेच व्यवसायात अपयश या सर्व समस्यांवर हा कार्यक्रम रामबाण ठरतो, असे आयोजकांनी म्हटले आहे.