वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीजपंप सुरू करत असताना २६ वर्षीय आकाश एकनाथ जाधव (रा. जाधव वस्ती शिऊर) याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना वैजापूर तालुक्यातील शिऊर शिवारात शुक्रवार(३० ऑगस्ट) सकाळी सहाच्या सुमारास घडली.
आकाश अविवाहीत होता. सकाळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी वीजपंप चालू करायला गेला असता स्टार्टरमध्ये विज प्रवाह उतरलेला होता. त्याला विजेचा जोरात शॉक लागला. नातेवाईकांनी त्याला शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शिऊर पोलिसांनी या प्रकरणी अाकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.