छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमी असल्याने शासनाने १ उपायुक्त आणि ३ सहायक आयुक्त दिले आहेत. सध्या अतिरिक्त पदभारावर कार्यभार सुरू होता. आता तो संपणार आहेत.
उपायुक्त म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उपसमाज विकास अधिकारी लखीचंद चव्हाण यांची बदली छत्रपती संभाजीनगरात झाली असून त्यांनी बुधवारी (२१ ऑगस्ट) पदभार स्वीकारला आहे. याशिवाय ३ प्रशिक्षणार्थी सहायक आयुक्त महापालिकेला देण्यात आले असून, यात गौरव वांदेकर, राहुल जाधव गुरुवारी (२२ ऑगस्ट) रुजू झाले. परिवीक्षाधीन मुख्याधिकारी प्राजक्ता वंजारी या सोमवारी (२६ ऑगस्ट) रुजू होणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.