छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना शहरातील गजकेसरी स्टील कारखान्यात आज, २४ ऑगस्टला स्टील गाळण्याच्या भट्टीत स्फोट होऊन २२ कामगार जखमी झाले. यातील चौघे गंभीर जखमी आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गजकेसरी स्टील कारखान्यात सळया, अँगलचे उत्पादन होते. कारखान्यातील लोखंड वितळविणाऱ्या भट्टीत अचानक मोठा स्फोट होऊन २२ कामगारांच्या अंगावर लोखंडी रस पडला. यात ते भाजले. १७ जखमी कामगारांवर जालन्याच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंत्री सावे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.