- Marathi News
- उद्योग-व्यवसाय
- २ मोठ्या कारवाया : आदर्श पतसंस्था घोटाळा : आजपासून २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; अजिंठा
२ मोठ्या कारवाया : आदर्श पतसंस्था घोटाळा : आजपासून २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार; अजिंठा बँक घोटाळा : आणखी ८ जणांना अटक
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ७५ टक्के ठेवीदारांना दिलासा मिळणार असून, २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आज, २२ ऑगस्टपासून परत करण्यात येत आहेत. पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. २५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव, बचत खाते व पिग्मी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ७५ टक्के ठेवीदारांना दिलासा मिळणार असून, २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आज, २२ ऑगस्टपासून परत करण्यात येत आहेत. पतसंस्थेतील सुमारे ३५ हजार ठेवीदारांपैकी २६ हजार ५०० ठेवीदारांची २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत. २५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव, बचत खाते व पिग्मी खाते असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जाणार असून, अशा ठेवीदारांनी दोन छायाचित्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची कागदपत्रे पतसंस्थेच्या एन-६ येथील मुख्य कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासक सुरेश काकडे यांनी केले आहे.
अजिंठा अर्बन बँकेतील ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बुधवारी (२१ ऑगस्ट) दोन व्यवस्थापकांसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी याबाबतची माहिती दिली. सोपान गोविंदराव डमाळे (वय ६२, रा.जवाहर कॉलनी), मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ (वय ५०, रा. बेगमपुरा), तत्कालीन शाखा व्यवस्थापक कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे (वय ५०, शहानूरवाडी), प्रशांत भास्कर फळेगावकर (वय ५६, रा. देवानगरी), राजू सावळाराम बाचकर (वय ४६, रा. सदानंदनगर), पोपट बाजीराव साखरे (वय ५३, रा. एन-२ सिडको), ज्ञानेश्वर ऊर्फ शरद सारजाराम पवार (वय ३५, रा. शिवशंकर कॉलनी), गणेश आसाराम दांगोडे (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी) यांचा बुधवारी अटक केलेल्यांत समावेश आहे. सीईओ प्रदीप कुलकर्णीला २ ऑगस्टला अटक झाली होती. या बँकेतून ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप, ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद व रिझर्व्ह बँकेला खोटा लेखापरीक्षण अहवाल पाठविण्यात आल्याचे समोर आले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
26 Jul 2025 09:48:29
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छावणी येथील विद्यादीप बालगृहाला शासनाने टाळे ठोकले असले तरी, त्यात राहणाऱ्या मुलींना कसे भयंकर छळले...