- Marathi News
- सिटी क्राईम
- खबरदार…आक्षेपार्ह पोस्ट शेअर कराल तर!; पोलीस आयुक्तांचा इशारा
खबरदार…आक्षेपार्ह पोस्ट शेअर कराल तर!; पोलीस आयुक्तांचा इशारा
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचे छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूरसह जिल्हाभरात संतप्त पडसाद उमटले. हजारोंचा जमाव वैजापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरला होता. सध्या जिल्ह्यात शांतता आहे. मात्र या शांततेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. आता पोलीस आयुक्तांनी आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्यांना दम भरला असून, अशांविरुद्ध […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचे छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूरसह जिल्हाभरात संतप्त पडसाद उमटले. हजारोंचा जमाव वैजापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरला होता. सध्या जिल्ह्यात शांतता आहे. मात्र या शांततेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. आता पोलीस आयुक्तांनी आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्यांना दम भरला असून, अशांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संवेदनशील परिसरांवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
26 Jul 2025 09:48:29
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छावणी येथील विद्यादीप बालगृहाला शासनाने टाळे ठोकले असले तरी, त्यात राहणाऱ्या मुलींना कसे भयंकर छळले...