तहसीलदार ज्‍याेती पवार निलंबन प्रकरणात ‘मॅट’चा अवमान; अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांना हजर होण्याचे आदेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती पवार यांना आहे त्या पदावर तत्काळ रुजू करून घेण्याच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून राज्याचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांना ‘मॅट’ने व्यक्तीशः अथवा वकिलामार्फत ३ ऑक्टोबर २०२४ रोजी हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे उपाध्यक्ष न्या. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती पवार यांना आहे त्या पदावर तत्काळ रुजू करून घेण्याच्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून राज्याचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांना ‘मॅट’ने व्यक्तीशः अथवा वकिलामार्फत ३ ऑक्टोबर २०२४ रोजी हजर राहण्याचे आदेश काढले आहेत.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे उपाध्यक्ष न्या. पुखराज आर. बोरा आणि प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांनी अवमान याचिकेच्या अनुषंगाने राजेशकुमार यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण…
फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या सावंगी येथील १४० एकर जमिनीपैकी २० एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली. उर्वरित ८० ते १२० एकर जमिनीतून महामार्गाच्या कामासाठी मुरूम उपसण्याच्या प्रकरणात ग्रामीण तहसीलदारांनी कारवाई न केल्याचा ठपका छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती पवार यांच्यावर ठेवून कारवाईची मागणी राजस्थानचे राज्यपाल आणि तत्कालीन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली होती. त्यावरून शासनाने ज्‍योती पवार यांना निलंबित केले आहे. त्‍यांना आहे त्या पदावर तत्काळ रुजू करून घेण्याच्या मॅटच्या आदेशाचे पालनही करण्यात आलेले नाही. त्‍यामुळे दाखल अवमान याचिकेत मॅटने आता राजेशकुमार यांना हजर होण्याचा आदेश दिला आहे. ज्‍योती पवार यांनी अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत मॅटमध्ये मूळ अर्ज दाखल केला होता. मूळ अर्जावर ३ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लाखांची नाही, आता करोडोंची गोष्ट करा... लक्झरी घरे लोकांना करताहेत आकर्षित!, खरेदीदारांची संख्या का वाढत आहे?

Latest News

लाखांची नाही, आता करोडोंची गोष्ट करा... लक्झरी घरे लोकांना करताहेत आकर्षित!, खरेदीदारांची संख्या का वाढत आहे? लाखांची नाही, आता करोडोंची गोष्ट करा... लक्झरी घरे लोकांना करताहेत आकर्षित!, खरेदीदारांची संख्या का वाढत आहे?
केवळ महागड्या कार आणि कपडेच नाही तर लक्झरी घरे देखील खरेदीदारांना आकर्षित करत आहेत. आता, बरेच लोक लाखो नव्हे तर...
इन्व्हर्टरवर चुकूनही चालवू नका या गोष्टी, लगेचच सर्व वीज संपवून टाकतील, नवीन बॅटरी घ्यावी लागेल विकत!
अभिनेता सिद्धार्थ निगम विशेष मुलाखत : दुपारी जेवलो तर रात्रीच्या जेवणाबद्दल माहीत नसायचं; वाईट परिस्थिती तुम्हाला मजबूत बनवते!
Analysis : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ‘बिग फाईट, वातावरण टाईट!’; शिरसाट, सावे, दानवेंमध्ये वर्चस्वाची लढाई
महिलेला मैत्रीण भेटायला आली, गप्पा मारल्या, जेवण केले, नंतर मैत्रिणीने असे काही केले की हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software