- Marathi News
- पॉलिटिक्स
- प्रहारचे कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनात सोडण्यासाठी घेऊन आले साप… पुढे घडला हा ड्रामा…
प्रहारचे कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनात सोडण्यासाठी घेऊन आले साप… पुढे घडला हा ड्रामा…
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज, १४ ऑगस्टला विद्यापीठात पिशवीत साप घेऊन आले होते. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या दालनात त्यांना साप सोडायचा होता. पोलिसांनी मध्यस्थी करून कुलगुरूंशी त्यांची भेट घडवून आणली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पिशवीतला साप बाहेर काढला नाही. नक्की कशामुळे आंदोलन?सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजंदारी कामगारांचे आंदोलन […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आज, १४ ऑगस्टला विद्यापीठात पिशवीत साप घेऊन आले होते. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या दालनात त्यांना साप सोडायचा होता. पोलिसांनी मध्यस्थी करून कुलगुरूंशी त्यांची भेट घडवून आणली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पिशवीतला साप बाहेर काढला नाही.
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजंदारी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर सेवेत घेण्याची त्यांची मागणी आहे. या आंदोलनाला प्रहारनेही पाठिंबा दिला आहे. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्न चर्चा करण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे वेळ मागितली. पण त्यांना टाळण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुलगुरूंनी चर्चेसाठी वेळ न दिल्यास बुधवारी त्यांच्या कक्षात साप सोडू, असा इशारा दिला होता.
प्रहारच्या आंदोलनाची कल्पना असलेल्या विद्यापीठ प्रशासनाने सर्पमित्रही बोलावून ठेवले होते. बेगमपुरा पोलीसही विद्यापीठात दाखल झाले. मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रवेशद्वार कुलूपबंद केलेले होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, शहराध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी सायंकाळी साप घेऊन आल्यानंतर पोलिसांनी त्यांना गाठून समजूत घातली. पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांची कुलगुरूंशी भेट घालून दिल्यानंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १६ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्याची ग्वाही कुलगुरूंनी दिली. आ. बच्चू कडू यांच्याशीही कुलगुरूंचे बोलणे करून देण्यात आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
26 Jul 2025 09:48:29
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छावणी येथील विद्यादीप बालगृहाला शासनाने टाळे ठोकले असले तरी, त्यात राहणाऱ्या मुलींना कसे भयंकर छळले...