छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : झाल्टा फाटा येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी मोठाच गंडा घातला आहे. सर्वेत लाइक, कमेंट करून चांगले रिव्ह्यूज द्यायचे त्याबदल्यात प्रत्येक रिव्ह्यूजमागे तुम्हाला दीडशे रुपये दिले जातील, असे आमिष त्यांना सायबर भामट्यांनी दाखवले आणि टप्प्याटप्प्याने तब्बल ८ लाख ४ हजार रुपये उकळले.
सिटी चौक पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी (८ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. ३५ वर्षीय ट्रान्सपोर्ट व्यावसायिक दिल्ली गेटजवळ एसबीएच कॉलनीत राहतात. त्यांचा झाल्टा फाटा येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. सायबर भामट्यांनी त्यांना आधी आमिष दाखवून विश्वास संपादन केला. नंतर वेगवेगळ्या रकमा मागून फसवणूक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.