फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : खासगी बँक कर्मचाऱ्याची ६ लाख १० हजार रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना फुलंब्री येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी १ च्या सुमारास घडली. फुलंब्री पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईनाथ जानुबा खिल्लारे हे एका खासगी बँकेचे वसुली प्रतिनिधी आहेत. गुरुवारी दुपारी एसबीआयच्या शाखेत पैसे जमा करण्यासाठी आले होते. त्यांच्या बॅगमध्ये ६ लाख १० हजार ४०० रुपये होते. खुर्चीवर बसून पैसे भरण्याची स्लिप भरत असताना जवळच ठेवलेली बॅग चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लांबवली. बॅग दिसून येत नसल्याने त्यांनी शोध घेतला. मात्र बॅग मिळून आली नाही. अखेर फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. अधिक तपास केला जात आहे.