छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खासगी कार आणि दुचाकीवर पोलीस लिहिलेले किंवा पोलीस बोधचिन्ह लावलेले दिसले तर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.
आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांना तपासणीदरम्यान अशा वाहनांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन अशी पाटी किंवा बोधचिन्ह असेल तर त्या वाहनावरही कारवाई करण्यात येणार आहेत. परिवहन विभागाकडे एका व्यक्तीने याबाबतची तक्रार केल्यानंतर आरटीओने पावले उचलली आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत यासंदर्भातील आदेश काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.