छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाचा हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा दिला. तो गुरुवारी (८ ऑगस्ट) दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून, आता नवे अध्यक्ष कोण होते, याची चर्चा सुरू झाली आहे.
संदीप बोरसे, गोकुळसिंग राजपूत, नंदू काळे राजेंद्र जैस्वाल यांच्या नावाची चर्चा आहे. निवडणूक बिनविरोध होते, की मतदानाची वेळ येईल हे लवकरच कळणार आहे. दूध संघावर वर्चस्व असणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.