छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना संसदेत जात विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची युवक काँग्रेसने गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढली. हे आगळेवेगळे आंदोलन गुरुवारी (८ ऑगस्ट) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रदेश युवक काँग्रेस सचिव मसरुर खान यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
दोन गाढवांना चपलांचा हार व अनुराग ठाकूर यांच्या चित्राचा मास्क घालून प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापूर्वीही ठाकूर यांनी अशीच वक्तव्ये केली आहेत. त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव इद्रीस खान, शहराध्यक्ष सागर नागरे, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष मोईन इनामदार, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शादाब शेख, माजी शहराध्यक्ष मुजफ्फर खान पठाण, शहर सरचिटणीस शेख शफीक सरकार, शेख फैज, लियाकत पठाण, आमेर खान, साजेद कुरेशी, फारूक शेख, नदीम सौदागर, आवेज पटेल, वसीम पटेल, मोहसीन खान, रिजवान खान, अशोक गहिलोत, मोहम्मद आमेर आदींनी सहभाग घेतला.