छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत समाज कल्याण अधिकारी गट-ब इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट – ब व इतर मागास बहूजन कल्याण अधिकारी गट-ब चाळणी परीक्षा – 2023 रविवार दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा केंद्रावर 35 परीक्षा केंद्रांवर एकूण 11 हजार 280 उमेदवारांच्या परीक्षेची सोय करण्यात आली असून 1048 अधिकरी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी दिली आहे.
परीक्षा केंद्रांची यादी व कंसात परीक्षार्थिंची संख्या याप्रमाणे :
- न्यु हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, पिसादेवी रोड, भगतसिंगनगर, हर्सुल (288)
- मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (सायसन्स बिल्डिंग भाग- अ) रोजा बाग, हर्सुल रोड, (288)
- मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय(टॉम पॅट्रीक बिल्डींग पार्ट – ब) रोजा बाग, हर्सुल रोड, (432)
- नुतन बहुउद्देशिय विद्यालय जळगाव रोड, हडको एन-11 हर्सुल (192)
- श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला एन-8 सिडको, (312)
- मुकुल मंदिर हायस्कूल, एन-7 सिडको, पोलीस स्टेशन जवळ, (288)
- धर्मवीर संभाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय एन-5 सिडको जवळ संत
तुकाराम नाटयगृह (312) - जिजामाता कन्या विद्यालय, एन – 5 सिडको (240) सिडको जवळ संत तुकाराम नाटयगृह
जवळ (240) - एम.जी.एम. जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालय एन-6 सिडको, सेट्रंल नाका
जवळ, (480) - एम.जी.एम. पॉलिटेक्निक एन-6 सिडको, सेट्रंल नाका जवळ, (312)
- राजर्षी शाहू इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट पी -75 गरवारे पॉलिस्टर जवळ, चिकलठाणा
(312) - वसंतराव नाईक महाविद्यालय, लेमन ट्री जवळ, चिकलठाणा रोड, (312)
- शिव छत्रपती महाविद्यालय, एन-3 जालना रोड, सिडको, (480)
- संत मीरा शाळा, प्लॉट नं 119/बी, एन-3 सिडको,(288)
- संत मीरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्लॉट नं 119/बी, एन-3 सिडको,(288)
- मराठवाडा तंत्रज्ञान व संस्था (एमआयटी) हायस्कूल आणि माहिती तंत्रज्ञान कॉलेज एन-4
सिडको (288) - डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन नवखंडा ज्युबली पार्क (312)
- जी.एस.मंडल महाराष्ट्र इन्सिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (बी-टेक) गेट लं-5 सातार गाव, बीड
बाय पास रोड, (384) - हॉली क्रास इंग्लिश हायस्कूल, बंगलो नं- 12 अहमदनगर रोड छावणी परिसर (408)
- पी.ई.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पानचक्की रोड नागसेनवन (408)
- मिलिंद बहुउद्देशिय हायस्कूल नागसेनवन (288)
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड कॉर्मस नागसेनवन (288)
- विवेकानंद कला व सरदार दिलीपसिंह वाणिज्य महाविद्यालय समर्थ नगर (288)
- विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थ नगर (288)
- एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ सायन्स औरंगपूरा (288)
- एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस आणि कॉर्मस (पार्ट – अ) औरंगपूरा (432)
- एस.बी.इ.एस. कॉलेज ऑफ आर्टस आणि कॉर्मस (पार्ट – ब) औरंगपूरा (432)
- सरस्वती भुवन मुलाची शाळा, औरंगपुरा (432)
- महिला मंडळ संचलित शिशु विहार हायस्कूल, बलवंत वाचनालयाच्या बाजूला
औरंगपूरा (288) - डॉ.सौ. इंद्राबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय, आर्टस, समर्थ नगर (288)
- शिवाजी हायस्कूल, खोकडपूरा शिवाजी नगर (240)
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा (288)
- मिलिंद विज्ञान महाविद्यालय, नागसेन वन (288)
- मिलिंद महाविद्यालय, नागसेन वन (288)
- शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, शासकीय सुभेदारी विश्रामगृहा जवळ (264)
परीक्षार्थिंसाठी सुचनाः- - परीक्षेस येतांना उमेदवारांने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकाराचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
- परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉल पाँईट पेन, ओळखपत्र
व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही. - उमेदवारास त्याच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटूथ, कॅमेरा किंवा
तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षाकक्षामध्ये घेऊन
जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर
परीक्षा केंद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य
ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य
दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह
त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षाकरीता बंदी घालण्यात येईल. - परीक्षा कक्षात शेवटच्या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या वेळेनंतर आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव अशा उमेदवारास प्रवेश देण्याचे प्राधिकार आयोगाच्या परस्पर कोणत्याही व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले नाहीत.
- प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यांनतर परीक्षा उपकेंद्राचे प्रवेशद्वार बंद करुन घेण्यात यावे.
- परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
- परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.