छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशाची मुदत संपली होती. विद्यार्थ्यांची वाढती मागणी आणि विविध जिल्ह्यांतून मुदत वाढीसाठी आलेल्या अभ्यास केंद्राच्या संयोजकांच्या विनंतीनुसार विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुदतवाढीमुळे आता विद्यार्थ्यांना विना विलंब शुल्क प्रवेश घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होम पेजवर जाऊन माहिती पुस्तिका २०२४-२५ या ठिकाणी विविध अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध होईल. विद्यापीठाने मुदतवाढ दिल्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा व विद्यापीठाचे प्रवेश नियमित करावेत.