जुलैच्या पहिल्या आठवड्यात ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांच्या प्रचंड अपेक्षांदरम्यान, निर्मात्यांनी नवीन सीझन रिलीज केला आणि सलोनी त्यागीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा सरगमने यावेळी शोमधून सर्वांची मने जिंकली. नेहाने मिर्झापूरच्या सीझन ३ मध्ये भरत त्यागी (विजय वर्मा) च्या पत्नी सलोनी त्यागीची भूमिका साकारली आहे.
क्राइम ड्रामा मालिकेतील तिच्या कामामुळे ती सर्वत्र चर्चेत आहे. नेहाने नुकतीच दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने तिच्या कारकिर्दीबद्दल आणि वैयक्तीक आयुष्याबद्दल संवाद साधला. सलोनी भाभीला मिळालेली प्रसिद्धी आणि तुम्हाला नॅशनल क्रशदेखील म्हटले जात आहे त्याबद्दल तुम्हाला कसे वाटते, असे विचारले असता ती म्हणाली, की नॅशनल क्रश ऐकून छान वाटतं, कोणाला आवडत नाही? मी कल्पनाही केली नव्हती. मी खूप काम केले आहे, अनेक वर्षांपासून काम करत आहे. पण आता जे घडले ते आजतागायत झाले नाही, असे ती म्हणाली.
या हंगामात तुझी भूमिका अधिक होती. शूटिंगच्या अनुभवाबद्दल आम्हाला काही सांग, असे विचारले असता नेहा म्हणाली, की मी सीझन २ मध्येही होते. त्यागी परिवार दाखवला तेव्हा माझा एक छोटासा परिचय होता. त्यावेळी लोकांनी माझ्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे तिसऱ्या भागात माझे काय होईल या विचाराने मी डिप्रेशनमध्ये जगत होते. पण नंतर मिळालेले यश खरंच आश्चर्यस्पद होतं. मी गुजरातहून मुंबईसाठी रात्री २ वाजता निघून पहाटे ५ वाजता पोहोचायचे. असे करून मी शूटिंग मॅनेज केले आहे, असे ती म्हणाली.
विजय वर्मासोबत स्टीमी सीन शूट करणं अवघड होतं की सोपं?, असे विचारले असता ती म्हणाली, की जेव्हा मी हा सीन केला तेव्हा मला ते अवघड वाटले नाही. पण ते करण्याआधी खूप भीती होती. यासाठी माझ्या निर्मात्यांनी मला सेटवर खूप समजावले. त्या सीनच्या शूटिंगच्या वेळी २-४ महत्त्वाच्या व्यक्तींशिवाय कोणीही तिथे उपस्थित नव्हते. सर्वजण बाथरूममध्ये गेले होते पण खोलीत फक्त ४ लोक होते. मी खूप घाबरले होते पण निर्मात्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. असे सीन्स करणाऱ्यांबद्दल माझा आदर खूप वाढला आहे, असे ती म्हणाली.
तुझी पार्श्वभूमी आणि कुटुंब याबद्दल काही सांग, तू कुठून आलीत, तुझी सुरुवात कशी झाली? यावर ती म्हणाली, की मी पाटणाची आहे. घरातील वातावरण नेहमीच संगीतमय असते. कारण घरातील प्रत्येकजण संगीतात असतो. आजोबांपासून वडिलांपर्यंत. मी पण संगीत शिकायचे. इंडियन आयडॉलमध्ये गेले होते पण तिथे माझी निवड झाली नाही. पण माझे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. लोक मला ओळखू लागले. त्यानंतर मला अभिनयाच्या ऑफर्स मिळू लागल्या, असे ती म्हणाली.