कन्‍नडच्या हिवरखेड्यात आढळला ३३ वर्षीय युवकाचा मृतदेह!; घात, अपघात की आत्‍महत्‍या?

On

कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : हिवरखेडा (ता. कन्‍नड) येथील गौताळा रस्त्यालगत ३३ वर्षीय युवकाचा मृतदेह शनिवारी (१९ जुलै) सायंकाळी साडेसहाला आढळल्याने एकच खळबळ उडाली. धारासिंग धर्म जाधव (रा. हिवरखेडा गौताळा) असे त्‍याचे नाव आहे. धारासिंग मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. गौताळा रस्त्यालगतच्या खासगी लॉन्सच्या बाजूला पादचाऱ्यांना ते बेशुद्धावस्थेत दिसले. त्यांना नातेवाइकांनी कन्‍नड ग्रामीण रुग्णालयात नेले […]

कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : हिवरखेडा (ता. कन्‍नड) येथील गौताळा रस्त्यालगत ३३ वर्षीय युवकाचा मृतदेह शनिवारी (१९ जुलै) सायंकाळी साडेसहाला आढळल्याने एकच खळबळ उडाली. धारासिंग धर्म जाधव (रा. हिवरखेडा गौताळा) असे त्‍याचे नाव आहे.

धारासिंग मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. गौताळा रस्त्यालगतच्या खासगी लॉन्सच्या बाजूला पादचाऱ्यांना ते बेशुद्धावस्थेत दिसले. त्यांना नातेवाइकांनी कन्‍नड ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. रविवारी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. धारासिंग यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. कन्नड शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. घातपात, अपघात की आत्‍महत्‍या, याची चर्चा सुरू असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

खबरें और भी हैं

म्‍हणे, तो दारूच्या नशेत मंत्री शिरसाटांच्या ताफ्यात घुसला, त्‍याला वाटलं समोर रस्ताच आहे!

Latest News

म्‍हणे, तो दारूच्या नशेत मंत्री शिरसाटांच्या ताफ्यात घुसला, त्‍याला वाटलं समोर रस्ताच आहे! म्‍हणे, तो दारूच्या नशेत मंत्री शिरसाटांच्या ताफ्यात घुसला, त्‍याला वाटलं समोर रस्ताच आहे!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खतरनाक गुन्हेगार सौरभ अनिल भोले (वय २४, रा. समतानगर, क्रांती चौक) हा मंत्री संजय शिरसाटांच्या...
पाऊस ‘ताण’ देतो म्‍हणून शिवाजीनगर भुयारी मार्ग पत्र्यांनी झाकणार!, उद्यापासून ३१ जुलैपर्यंत दर्गा चौकातून वळसा घालावा लागणार
पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या युवतीवर प्रेमजाळे, २ वर्षे संबंध, तिने बोलणे सोडल्यावर ब्‍लॅकमेल!
मस्तवालपणाचा कहर : ट्युशनमध्ये मुलींच्या भांडणावरून पोलीस निरीक्षकाच्या भावाने कुटुंबाचे घर गाठून लाठ्याकाठ्यांनी चढवला हल्ला, मुलीच्या आईला पायावर नाक घासायला लावले!
मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू, छत्रपती संभाजीनगरात बच्‍चू कडूंचा सरकारला इशारा, क्रांती चौकात चक्‍का जाम आंदोलन

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software