EXCLUSIVE : माथेफिरू शेतकऱ्याने खोदला आ. बंब यांनी बनवलेला रस्ता!; पावसात विद्यार्थ्यांची शाळा अन्‌ शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद!, वस्तीवरून मुख्य रस्‍त्‍यापर्यंत येण्याजाण्याचीही पंचाईत!!, अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप

On

छत्रपती संभाजीनगर (भालचंद्र पिंपळवाडकर : सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने थेट आ. प्रशांत बंब यांच्या नाकावर टिच्चून त्‍यांनी बनवलेला रस्ता खोदला आहे. सरकारच्या निर्णयालाही फाट्यावर मारले असून, अधिकाऱ्यांच्या आदेशालाही तो जुमानत नसल्याने या रस्‍त्‍यावर अवलंबून असलेले शेतकरी हवालदील झाले आहेत. सोबतच विद्यार्थी मात्र चिंताग्रस्त चेहऱ्याने आता शाळेत जायचे कसे, या संकटात सापडले आहेत. […]

छत्रपती संभाजीनगर (भालचंद्र पिंपळवाडकर : सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने थेट आ. प्रशांत बंब यांच्या नाकावर टिच्चून त्‍यांनी बनवलेला रस्ता खोदला आहे. सरकारच्या निर्णयालाही फाट्यावर मारले असून, अधिकाऱ्यांच्या आदेशालाही तो जुमानत नसल्याने या रस्‍त्‍यावर अवलंबून असलेले शेतकरी हवालदील झाले आहेत. सोबतच विद्यार्थी मात्र चिंताग्रस्त चेहऱ्याने आता शाळेत जायचे कसे, या संकटात सापडले आहेत. शेतमाल शेतातून ने-आण करता येत नाही. शेतवस्तीवर राहणाऱ्यांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. माथेफिरू शेतकऱ्याने अन्य शेतकरी आणि रहिवाशांसोबतच सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना घायकुतीला आणले आहे. त्‍यामुळे त्‍याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०२३ मध्ये तुंबलेले पाणी आणि चिखल तुडवत शेतवस्तीवरील मुले दफ्तर सांभाळत शाळेत जाण्यासाठी कसरत करत होते, तेव्हा ते दुर्दैवी चित्र पाहून आ. प्रशांत बंब यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जुने कायगाव येथील अहिल्याबाई बारव ते नजन वस्ती या गट नं. ९८ मधील रस्त्याचे खडीकरण करवले होते. यासाठी १० लाख रुपयांचा खर्च झाला होता. कसा का होईना रस्ता झाल्याने या रस्‍त्‍यावरून अवलंबून असलेले शेतकरी आणि शेतवस्तीतील नागरिक सुखावले होते. मात्र त्‍यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. माथेफिरू शेतकऱ्याने जेसीबी लावून हा रस्ताच खोदून टाकला.

त्‍यामुळे आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी, शेतवस्तीवरील नागरिक, त्‍यांची मुले हैराण झाले आहेत. या शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मुख्य रस्‍त्‍यावर येण्याचा हा एकमेव रस्ता आहे. वैतागलेल्या या सर्व कुटुंबांनी तातडीने प्रशासनाने यातून मार्ग शोधून रस्ता बनवून दिला नाही तर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. हा रस्ता नकाशावर असल्याचे तहसीलदारांनीही मंडळ अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांना स्‍थळपाहणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र मंडळ अधिकाऱ्यांनी पुढे काय केले, हे कळायला मार्ग नाही. प्रशासनाने गायकवाडपुढे हात टेकल्याचे चित्र आहे. त्‍याचा परिणाम अन्य शेतकरी, विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे.

शेतकरी, मुले उद्विग्‍न…
माथेफिरू शेतकऱ्याच्या कृत्‍यामुळे हैराण झालेल्या शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी उद्विग्नता व्यक्‍त केली आहे. एकीकडे रस्‍त्‍यासाठी छत्रपती संभाजीनगरात मोठमोठ्या इमारती पाडल्या जात असताना इकडे रस्ताच खोदण्यात आल्याचा प्रकार घडल्याकडे त्‍यांनी लक्ष वेधले आहे. चिमुकली शाळकरी मुले आपल्या भावना व्यक्‍त करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आ. बंब यांना रस्‍त्‍यासाठी आर्जव करताना व्हिडीओत दिसत आहेत. त्‍यामुळे आता प्रशासकीय यंत्रणा, ज्‍यांनी बनवलेला रस्ता खोदला ते आ. बंब याप्रकरणात लक्ष घालून शेतकरी, विद्यार्थ्यांना दिलासा देतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात आ. प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार संपर्क केला, मात्र होऊ शकला नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Health News : हाडांच्या कर्करोगाची लक्षणे : थकवा-कमकुवतपणा... कर्करोग हाडांना वाळवीसारखे खाईल, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Latest News

Health News : हाडांच्या कर्करोगाची लक्षणे : थकवा-कमकुवतपणा... कर्करोग हाडांना वाळवीसारखे खाईल, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका Health News : हाडांच्या कर्करोगाची लक्षणे : थकवा-कमकुवतपणा... कर्करोग हाडांना वाळवीसारखे खाईल, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
कर्करोग हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे, ज्याचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक हाडांचा कर्करोग आहे. ज्याला हाडांचा सारकोमा...
धर्म : श्रावणात घराच्या या दिशेला बेलाचे झाड लावा; महादेव प्रसन्न होतील, तिजोरी धनाने भरेल!
Tech News : चॅटजीपीटीशी बोलताना नका करू मन मोकळं; अडचणीत येऊ शकता!; ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी स्पष्टच सांगितलं...
सिडको एन ५ मधील स्काय ब्लू कॅफेवर हल्ला!; कॅफेचालक दोन्ही भावांवर चाकू, लोखंडी रॉडने वार, तिघे गंभीर
कुटूंब दावतला जाताच चोरट्यांनी केले घर साफ!, बायजीपुऱ्यातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software