छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको एन २ मधील दोन CA बंधूंच्या घर, कार्यालये, कॉलेजवर आयकर विभागाचा छापा

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयकर विभागाने छत्रपती संभाजीनगरात रविवारी (१४ जुलै) पहाटे साडेपाचला मोठी कारवाई केली. सिडको एन २ ठाकरेनगरातील एका सीएच्या फर्म, घर आणि आस्थापनांवर एकाचवेळी छापा मारला. दोघा सीए बंधूंनी करचोरी प्रकरणात मदत केल्याचा संशय आहे. आयकर विभागाने कारवाई करताना स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेतले होते. कारवाईचे तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयकर विभागाने छत्रपती संभाजीनगरात रविवारी (१४ जुलै) पहाटे साडेपाचला मोठी कारवाई केली. सिडको एन २ ठाकरेनगरातील एका सीएच्या फर्म, घर आणि आस्थापनांवर एकाचवेळी छापा मारला. दोघा सीए बंधूंनी करचोरी प्रकरणात मदत केल्याचा संशय आहे. आयकर विभागाने कारवाई करताना स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेतले होते. कारवाईचे तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

सिडको एन-२ ठाकरेनगर येथील क्लासेस, घरे, सिडको एन-४ येथील ज्युनिअर कॉमर्स कॉलेज आणि हर्सूल टी पॉइंट येथील कार्यालय अशा तिन्ही ठिकाणी छापा मारण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. २०१५ मध्येही याच सीए फर्मवर आयकर विभागाने कारवाई केली होती, हे विशेष. हे कुटुंब ठाकरेनगरात राहते. आधी त्‍यांचे किराणा दुकान होते. एक भाऊ सीए झाल्यावर दुसराही त्‍याच्यापासून प्रेरित होऊन सीए झाला. दोघांनी ८ वर्षांपूर्वी सीए घडविण्यासाठी अकादमी सुरू केली. दीड वर्षापूर्वी आणखी एक अकादमी सुरू केली. अभ्यासिका आणि ट्युशनही चालवण्यात येते. छाप्यात आयकर विभागाला महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. ४ दिवस चौकशी चालणार असल्याचेही सांगण्यात आले. पंजाब, मुंबई आणि नाशिकहून आलेल्या आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कारवाईत सहभाग आहे. ते रविवारी मध्यरात्रीच ७० हून अधिक गाड्या घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले.

देशभरात १५० ठिकाणी पडताळणी मोहीम…
आयकर विवरणपत्रात (आयटीआर) खोटी वजावट आणि करसवलती दाखवून परतावा मिळवणाऱ्या व्यक्ती, त्यांना मदत करणारे सीएंविरुद्ध देशभरात मोठी माेहीम आयकर विभागाने उघडली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशात १५० ठिकाणी छापे मारण्यात आले. त्याचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरच्या दोन सीए बंधूंपर्यंत आले. मागील काही महिन्यांत तंत्रज्ञानाच्या आधारे संशयास्पद व्यवहार ओळखून ही कारवाई करण्यात येत आहे. करचुकवेगिरीचे पुरावे मोठ्या प्रमाणात आयकर विभागाला मिळाले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

Latest News

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला
अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्‍चून भरल्या जातात स्‍कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software