- Marathi News
- सिटी क्राईम
- विठ्ठलनगर, रामनगरात टवाळखोरांचा धुडगूस!; लाठ्याकाठ्यांनी वाहनांची तोडफोड, मुलींना पाहून शेरेबाजी, पो...
विठ्ठलनगर, रामनगरात टवाळखोरांचा धुडगूस!; लाठ्याकाठ्यांनी वाहनांची तोडफोड, मुलींना पाहून शेरेबाजी, पोलिसांसाठी ‘अदखलपात्र’ ठरणाऱ्या प्रकारांमुळे नागरिक दहशतखाली!!
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाणे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दोन लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायांचा पर्दाफाश नागरिकांनाच करावा लागला होता. अवैध धंदे, नशेखोरीतून गुन्हेगारी कृत्ये, टवाळखोरांचा उच्छाद यामुळे नागरिक दहशतीखाली आले आहेत. रविवारी (१३ जुलै) पहाटे अडीचला विठ्ठलनगर, प्रकाशनगरात टवाळखोरांनी कहरच केला. मुख्य रस्त्यावर धिंगाणा घालत तान्हाजीनगरमध्ये जाऊन […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाणे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दोन लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायांचा पर्दाफाश नागरिकांनाच करावा लागला होता. अवैध धंदे, नशेखोरीतून गुन्हेगारी कृत्ये, टवाळखोरांचा उच्छाद यामुळे नागरिक दहशतीखाली आले आहेत.
नशेखोरांचा बंदोबस्त करणे पोलिसांसाठी अवघड नाही. मग पोलीस गांभीर्याने या गोष्टी का घेत नाहीत, तोडफोड, मुलींची छेडछाड, शांतता भंग करणे अशा गोष्टी घडत असताना आणि विशेष म्हणजे नागरिकांनी लेखी तक्रार केली असतानाही पोलीस नशेखोरांना का अभय देत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यात पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 15:36:12
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....