अल्पवयीन लेकीला अमानुष वागणूक, उपाशी ठेवायचे, चटके द्यायचे, बेदम मारहाण करायचे, बाथरूममध्ये राहायला लावायचे…वाळूज MIDC तील अंगावर शहारे आणणारी छळकहानी!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन न्यूजडेस्क) : लेकीला अमानुष वागणूक देत अनन्वीत छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून तिच्या आई-वडिलांविरुद्ध आज, १४ जुलैला गुन्हा दाखल केला आहे. बाथरूम, गच्‍चीवर राहायला लावण्यापासून तर बेदम मारहाण करणे, उपाशी ठेवणे, चटके देणे असे प्रकार या मुलीसोबत सुरू होते. १७ वर्षीय कीर्ती […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन न्यूजडेस्क) : लेकीला अमानुष वागणूक देत अनन्वीत छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आला आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून तिच्या आई-वडिलांविरुद्ध आज, १४ जुलैला गुन्हा दाखल केला आहे. बाथरूम, गच्‍चीवर राहायला लावण्यापासून तर बेदम मारहाण करणे, उपाशी ठेवणे, चटके देणे असे प्रकार या मुलीसोबत सुरू होते.

१७ वर्षीय कीर्ती (नाव बदलले आहे) मुलीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती वाळूज एमआयडीसीच्या कमळापुरातील समर्थनगरात राहत होती. सध्या तिला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार, सिडको महानगरातील सावली बालगृहात ठेवण्यात आले आहे. तिचे आई-वडील मूळचे राजस्थानचे असून, अनेक वर्षांपासून कमळापूरमध्ये राहतात. तिचे वडील बजाज कंपनीत काम करतात. आई घरकाम करते. कीर्तीला दोन मोठ्या बहिणी व दोन लहान भाऊ आहेत. कीर्ती तिसरी मुलगी असल्यामुळे लहानपणापासूनच आजी-आजोबाकडे राजस्थानला राहत होती. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले. तिचे आजोबा वृद्धापकाळाने वारले त्यावेळी तिची आठवीची परीक्षा चालू होती. १ जानेवारी २०२० रोजी लॉकडाऊन लागल्याने ती आई- वडिलांकडे राहायला छत्रपती संभाजीनगरला आली. लॉकडाऊनमुळे दोन वर्षे इथेच राहिली.

छत्रपती संभाजीनगर येथे राहत असताना तिची आई घरातील कामे करायला सांगायची. चपाती निट झाली नाहीतर हाताला चिमट्याने चटके द्यायची. तिला जेवायला देत नव्हती. आई- वडील दोघेही तिला मारहाण करत होते. भाऊ- बहीण तिला बोलत नव्हते. तिची आई म्हणायची, की तू सावत्र आजीकडे इतके दिवस राहिली तर लग्नासाठी ज्वेलरी घेऊन ये. त्यावेळी कीर्ती त्यांना म्हणायची, की मी आजीकडून काही आणणार नाही. त्यावर तिची आई तिला बाथरूममध्ये, गच्चीवर रहायला लावायची. घरातून बाहेर निघू देत नव्हते. तिला नवीन कपडे खरेदी करून देत नव्हते. आजीकडून आणलेले कपडेच ती घालत होते. आई तिला खूप मारायची. एकेदिवशी तिच्या वडिलांनी दामिनी पथकाला फोन करून बोलावले. तिला समजावून सांगितले. मात्र तिला आई -वडिलांकडे रहायचे नव्हते. त्यामुळे बाल कल्याण समितीपुढे हजर केले. तिला ९ जानेवारी २०२४ पासून विद्यादीप बालगृहात ठेवण्यात आले. आई-वडिलांकडे राहत असताना त्यांनी वेळोवेळी हाताचापटांनी मारहाण केली. चपाती निट येत नाही म्हणून हाताला आईने चटके दिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

Latest News

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला
अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्‍चून भरल्या जातात स्‍कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software