- Marathi News
- पॉलिटिक्स
- कश अन् कॅश : व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या राऊतांवर संजय शिरसाट ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा, आ. अंबादास द...
कश अन् कॅश : व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या राऊतांवर संजय शिरसाट ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा, आ. अंबादास दानवे म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कश आणि कॅशसोबत असलेल्या मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल करून बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मंत्री शिरसाट हे मानहानीची नोटीस बजावणार असून, त्यांनी माफी मागितली नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. राऊत यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. ते […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कश आणि कॅशसोबत असलेल्या मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल करून बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मंत्री शिरसाट हे मानहानीची नोटीस बजावणार असून, त्यांनी माफी मागितली नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.
ठाकरे गटाचे नेते आ. अंबादास दानवे यांनी हॉटेल व्हिट्स लिलाव प्रकरण लावून धरले आहे. आता त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या पत्नी व मुलासह इतर तीन भागीदार कोण होते, याचा खुलासा करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. शिरसाट यांच्या मुलाने माध्यमांसमोर येऊन हॉटेल खरेदीबाबतची माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
तीन पक्षांच्या सरकारमध्ये एकमेकांचा पत्ता कापण्याचे काम सुरू, भास्कर जाधव यांना शंका
तीन पक्षांच्या सरकारमध्ये अंतर्गत राजकारण सुरू झाले असून, एकमेकांचा पत्ता कापण्याचे काम सुरू झाले आहे. आधी धनंजय मुंडे, जयकुमार गोरे यांच्यानंतर आता संजय शिरसाट यांची विकेट पाडण्यासाठी डाव सुरू आहे, असे खळबळजनक वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. हॉटेल व्हिट्स लिलाव प्रकरण, त्यानंतर जमीन घोटाळ्याचे आरोप आणि आता बेडरूममध्ये पैशांचा बॅग घेऊन बसलेला व्हिडीओ यामुळे शिरसाटांना अडचणीत आणले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला बळ देण्याचे काम भास्कर जाधव यांनी केले. शिरसाट यांचा व्हिडीओ जवळच्याच कुणीतरी माणसाने काढला असेल, असेही जाधव यांनी सांगत महाराष्ट्रात या लोकांचे सरकार निवडून दिल्याबद्दल जनतेला पश्चाताप होतोय. मोठ्या प्रमाणात यांचे आमदार निवडून आल्यामुळे ही मस्ती आलेली आहे. विरोधी पक्ष हा थोडा आहे आणि आमचा आवाज दाबला जातोय. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात आहेत. आपण यांना या ठिकाणी आणून काय केले याचा विचार जनतेने केला पाहिजे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.