- Marathi News
- Uncategorized
- रत्नाकर नवले छत्रपती संभाजीनगर शहराचे नवे पोलीस उपायुक्त, ATS ची धुरा बजरंग बनसोडे यांच्याकडे
रत्नाकर नवले छत्रपती संभाजीनगर शहराचे नवे पोलीस उपायुक्त, ATS ची धुरा बजरंग बनसोडे यांच्याकडे
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक आणि अप्पर अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाने केल्या असून, यात छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्तपदी मुंबईतील ‘फोर्स वन’चे अप्पर पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांची बदली झाली आहे. आधी त्यांची बदली अमरावतीला झाली होती, ती रद्द करून छत्रपती संभाजीनगरला ते नियुक्त झाले. छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक आणि अप्पर अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाने केल्या असून, यात छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्तपदी मुंबईतील ‘फोर्स वन’चे अप्पर पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांची बदली झाली आहे. आधी त्यांची बदली अमरावतीला झाली होती, ती रद्द करून छत्रपती संभाजीनगरला ते नियुक्त झाले.
पोलीस उपायुक्त नवनीत काँवत आणि नितीन बगाटे यांच्या बदलीनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील उपायुक्तांचे पद रिक्त झाले होते. मुंबईतील फोर्स वनचे अप्पर पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले हे आता शहराचे नवे पोलीस उपायुक्त झाले आहेत. आता शहरात पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि रत्नाकर नवले असे ४ पोलीस उपायुक्त झाले आहेत. शर्मिष्ठा घारगे आणि रत्नाकर नवले हे अद्याप रूजू झालेले नसल्याची माहिती अधिकारिक सूत्रांनी दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...