काळा गणपती मंदिर कार अपघात : चालक प्रशांत मगरची हर्सूल कारागृहात रवानगी

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन १ मधील काळा गणपती मंदिरासमोर सुसाट कारने ६ जणांना उडवले होते. त्‍यातील एकाचा मृत्‍यू झाला होता. पोलिसांनी कारचालक प्रशांत एकनाथ मगर (वय ३१, रा. सिडको एन १) याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी (५ जुलै) त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन १ मधील काळा गणपती मंदिरासमोर सुसाट कारने ६ जणांना उडवले होते. त्‍यातील एकाचा मृत्‍यू झाला होता. पोलिसांनी कारचालक प्रशांत एकनाथ मगर (वय ३१, रा. सिडको एन १) याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी (५ जुलै) त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली.

अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. काळा गणपती मंदिरासमोरील सर्व्हिस रोडवर ४ जुलैला सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव स्विफ्ट डिझायर कारने (एमएच २० एचएच ०७४६) सहा जणांना उडवले. यात मंदिराची १५ वर्षांपासून सेवा करणारे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय ७०, रा. विठ्ठलनगर, रामनगर) जागीच मृत्युमुखी पडले, तर ५ जण जखमी झाले होते. अपघातानंतर तासभरातच सिडको एमआयडीसी पोलिसांनी कारचालक प्रशांत मगरला अटक केली होती. त्‍याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

प्रशांत नेहमीप्रमाणे सूतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुलातून टेनिस खेळून परतत पिरॅमिड चौकातून सर्व्हिस रोडवर सुसाट कार घेऊन निघाला होता. मंदिराच्या अलीकडे साकोळकर रुग्णालयासमोरील तीन दुचाकींना धडक दिली. तिथे न थांबता थेट मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत सहा जणांना चिरडत गेला. ज्‍या कारने अपघात घडवला ती त्‍याने तीन महिन्यांपूर्वीच नवीन खरेदी केली होती. प्रशांत उच्‍चशिक्षित असून, सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे. पोलिसांना त्‍याने माझ्याकडून ब्रेकऐवजी ॲक्‍सीलेटरवर पाय पडल्याने अपघात झाल्याचे सांगितले. कार ऑटोमेटिक असल्याने वेगात पुढे गेली, असे तो म्‍हणाला. मात्र पोलिसांनी त्‍याचा दावा खोडत तो आधीपासूनच भरधाव होता, असे सांगितले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software