Good Morning News : प्रतिपंढरपुरात १२ लाख भाविकांची गर्दी उसळणार, ५०० पोलीस, ६४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, दीड ते दोन तास लागू शकतात दर्शनाला, मंत्री शिरसाटांच्या हस्ते सपत्‍नीक पूजा

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील प्रतिपंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी १२ लाख भाविकांची गर्दी उसळण्याची शक्‍यता आहे. मध्यरात्री १ पासूनच भाविकांची रांग लागली असून, पहाटे ही रांग अर्धा किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत गेल्याचे दिसून आले. पहाटे १२ ला विठ्ठलाला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सपत्नीक पूजा केली. पहाटे १ पासून दर्शनरांग लागली आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील प्रतिपंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी १२ लाख भाविकांची गर्दी उसळण्याची शक्‍यता आहे. मध्यरात्री १ पासूनच भाविकांची रांग लागली असून, पहाटे ही रांग अर्धा किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत गेल्याचे दिसून आले. पहाटे १२ ला विठ्ठलाला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सपत्नीक पूजा केली. पहाटे १ पासून दर्शनरांग लागली आहे. आज, ६ जुलैच्या रात्री १२ पर्यंत रांग कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

भाविकांच्या सुक्षेसाठी ५०० पोलीस तैनात करण्यात आले असून, ६४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. ओअॅसिस चौकातून दर्शनासाठी रांग लागली आहे. दीड-दोन तास रांगेत प्रतीक्षा केल्यानंतर भाविकांचे दर्शन होईल. मंदिर परिसरात फुले, नारळांच्या स्टॉलला २ कि.मी. अंतरापर्यंत यंदा बंदी घालण्यात आली आहे. यंदा मंदिर परिसरात नारळ फोडण्यावर मनाई आहे. भाविकांच्या वाहनांसाठी धुळे-सोलापूर उड्डाणपुलाखाली असलेल्या चौकाजवळ ५ हजार वाहने बसू शकतील, अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

मोठ्या पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. फडणवीस यांना आषाढीच्या महापूजेचा पाचव्यांदा मान मिळाला. यंदा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील जातेगावच्या कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) या वारकरी दाम्पत्यास महापूजेचा मान मिळाला. रविवारी पहाटे २.२० वाजता सुरू झालेली महापूजा ३.०५ मिनिटांनी संपली. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस दाम्पत्य व मानाचे वारकरी उगले दाम्पत्यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा झाली. त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा झाली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

Latest News

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला
अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्‍चून भरल्या जातात स्‍कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software