छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूजजवळील नायगाव बकवालनगरमध्ये उघड्या विद्युत बॉक्सला धक्का लागून वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (४ जुलै) सायंकाळी घडली. तानाबाई नाथा चव्हाण (७५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तानाबाई यांना वाचण्यासाठी मारिया बिबन पठाण या मुलीने प्रयत्न केला असता तिलाही विजेचा सौम्य धक्का बसला. तानाबाई यांना दोन मुले व नातवंडे आहेत. नागरिकांनी कळवल्यावर महावितरणने वीजपुरवठा खंडित केला.