छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकूण १५५ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांची आरक्षण सोडत सोमवारी (७ जुलै) तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी अकराला जाहीर होणार आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी महिलांसाठी सरपंचपदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी व ठरविलेल्या वेळेत सभागृहामध्ये नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.