भुमरेंचा चालक जावेदवर ९ तास प्रश्नांचा भडीमार, पण चौकशीत सहकार्य करेना!; १५० कोटींच्या जमिनीचे गौडबंगाल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांना हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिली आहे. परभणीच्या ॲड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, सोमवारी (३० जून) त्‍याची तब्बल ९ तास कसून चौकशी करण्यात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांना हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिली आहे. परभणीच्या ॲड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, सोमवारी (३० जून) त्‍याची तब्बल ९ तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र त्‍याने जमिनीसंदर्भात कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत, की चौकशीला सहकार्यसुद्धा केले नाही. तो वकिलासह पोलीस आयुक्तालयात हजर झाला होता.

सालारजंगचे वंशज मीर महेमूद अली खान हे मात्र आजाराचे कारण पुढे करून चौकशीला आले नाहीत. त्‍यांनी अर्ज करून ३ दिवसांची वेळ मागितली. जावेद सकाळी ११:३० वाजता पोलीस आयुक्तालयात वकिलासह आला. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह तीन अधिकाऱ्यांनी त्याची एकट्यात चौकशी केली. सालारजंग वंशजांसोबत नाते असल्याने जमीन मिळाल्याचा दावा त्याने केला होता. पोलिसांनी त्याला सबळ पुराव्यासह नाते सिद्ध करण्याची सूचना केली. त्याला पोलिसांनी दिलेली प्रश्नावलीतही त्‍याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्‍यामुळे आज, १ जुलैला सकाळी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस त्‍याला देऊन रात्री ८ वाजता सोडून देण्यात आले.

काय आहे प्रकरण…
सालारजंगचे वंशज मीर महेमूद अली खान यांनी भुमरेंकडून मोठी रक्कम घेऊन चालक जावेदच्या नावे १५० कोटींच्या जमिनीचा बनावट हिब्बानामा (दानपत्र) करून दिल्याचा आरोप अॅड. मुजाहीद खान यांनी केला आहे. काल्डा कॉर्नर येथील ही ३ एकर जमीन असून, अॅड. मुजाहिद इकबाल खान समीरउल्ला खान (रा. परभणी) यांच्या नावे आधी ९० लाख ते एक कोटी रुपयांच्या व्यवहारात जमिनीचे ॲग्रिमेंट टू सेल, नोंदणीकृत मुखत्यारनामा व हिब्बानामा करून दिला होता, असा दावा ॲड. खान यांचा आहे. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ॲड. खान यांचे म्हणणे आहे की खासदाराच्या ड्रायव्हरचा सालार जंग यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही, मग ते मौल्यवान मालमत्ता का देतील? ड्रायव्हर जावेद १३ वर्षांपासून भुमरे पिता-पुत्रांची गाडी चालवत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software