पैठण रोडवर पहिला हातोडा माजी महापौर घोडेलेंच्या हॉटेलवर! ; ४७७ अतिक्रमणे जमीनदोस्त!!

On

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण रोड ६० मीटर रूंद करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करत सोमवारी (३० जून) सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ४७७ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कारवाईत महापालिकेचे ३००, पोलिसांचे २०० अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. आज, १ जुलैला पैठणकडे जाताना उजव्या बाजूची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. जालना रोडने मोकळा श्वास घेतल्यानंतर आता पैठण […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण रोड ६० मीटर रूंद करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी संयुक्‍त कारवाई करत सोमवारी (३० जून) सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ४७७ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कारवाईत महापालिकेचे ३००, पोलिसांचे २०० अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. आज, १ जुलैला पैठणकडे जाताना उजव्या बाजूची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.

जालना रोडने मोकळा श्वास घेतल्यानंतर आता पैठण रोडकडे महापालिकेने मोर्चा वळवला आहे. पाच पथके प्रत्‍येक पाचशे मीटर अंतरावर तैनात करून कारवाईला सुरुवात केली. पहिला हातोडा माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हॉटेलवर पडला. हॉटेलच्या दर्शनी भागावर जेसीबी चालला. महानुभाव आश्रमाने स्वतःहून बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. बांधकाम परवानगी असलेल्या उद्योजकांना १५ ऑगस्टची मुदत देण्यात आली. कांचनवाडी व नक्षत्रवाडीत सर्वाधिक अतिक्रमणे होती, ती बुलडोझरने उद्‌ध्वस्त करण्यात आली. यात लॉज, दुकाने, शेड, कंपाऊंड, ओटे, गॅरेज, वॉशिंग सेंटर, मेडिकल स्टोअर, डेली नीड्‌स, जाहिरात फलके काढण्यात आली. काही घरांवरही बुलडोझर चालला. त्‍यामुळे नागरिकांनी आक्रोश केला. महिलांची रडारड, संसारोपयोगी साहित्‍य हलविण्यासाठी पळावळ काळीज भेदत होते. १० जेसीबी, ४ पोकलेन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्‍निशमन बंब, ४ इलेक्‍ट्रिक हायड्रॉलिक वाहनांचा कारवाईत समावेश होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software