Tuesday, July 15, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home एक्‍सक्‍लुझिव्‍ह

भुमरेंच्या चालकाला १५० कोटींची जमिनीचे दान : जावेदच्या पत्रकारांना मुलाखती पण पोलिसांनी बोलावूनही येईना!; उद्या चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस

भुमरेंच्या चालकाला १५० कोटींची जमिनीचे दान : जावेदच्या पत्रकारांना मुलाखती पण पोलिसांनी बोलावूनही येईना!; उद्या चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांना हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिली आहे. ॲड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एकीकडे पत्रकारांना मुलाखती देऊन भुमरे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या जावेद यांना पोलिसांकडे येण्यास आणि पोलिसांनी केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास वेळ मिळालेला नाही. नोटीस बजावूनही जावेद आणि हिबानामा म्हणजेच देणगी पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत आले नाहीत. आता सोमवारी (३० जून) जमीन व व्यवहाराच्या मूळ कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याची नोटीस दोघांना बजावण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

ॲड. मुजाहिद इकबाल खान समीरउल्ला खान (रा. परभणी) यांच्या तक्रारीनुसार, सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान यांनी भुमरेंकडून मोठी रक्कम घेऊन जावेद रसूल शेख याच्या नावे बनावट हिबानामा करून दिला आहे. भुमरे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हिबानामा कायदेशीररित्या केवळ रक्ताच्या नातेवाईकांमध्येच वैध आहे. सालार जंगचे वंशज आणि ड्रायव्हर केवळ असंबंधित नाहीत तर ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथांचे आहेत. सालारजंग घराण्याचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते. हिबानामा म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला कोणताही आर्थिक मोबदला न घेता भेट स्वरुपात देते.

यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने बोलावल्यानंतर जावेदने हजर होत प्राथमिक जबाब नोंदवला होता. नंतर बोलावूनही तो आला नाही. दुसरीकडे पत्रकारांकडे मात्र भुमरेंचा कोणताही संबंध नसल्याच्या मुलाखती देताना दिसला आहे. महेमूद चक्क वारंवार बोलावूनही आलेलेच नाहीत. दूध डेअरी सिग्‍नल ते काल्डा कॉर्नर मार्गावर हा अंदाजे १५० कोटींचा पडीक भूखंड आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय पोलीस घेणार आहेत. दरम्‍यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लक्षवेधक आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या नेत्‍यांच्या चौकशा लावल्याचा आरोप त्‍यांनी केला. खैरेंचा आरोप केवळ राजकीय स्टंट असल्याचे आ. विलास भुमरे म्हणाले.

Previous Post

खडी रोडवर प्रशासन, कंत्राटदाराकडून ‘यमदेवाची स्थापना’; बळी गेल्याशिवाय काम न करण्याचा पवित्रा?

Next Post

धक्कादायक… मंगळसूत्र चोर महिलांच्या जिवावर उठले!; न्यायनगरात मंगळसूत्र हिसकावल्यानंतर विरोध केल्याने अंगावर गाडी घातली

Next Post
धक्कादायक… मंगळसूत्र चोर महिलांच्या जिवावर उठले!; न्यायनगरात मंगळसूत्र हिसकावल्यानंतर विरोध केल्याने अंगावर गाडी घातली

धक्कादायक… मंगळसूत्र चोर महिलांच्या जिवावर उठले!; न्यायनगरात मंगळसूत्र हिसकावल्यानंतर विरोध केल्याने अंगावर गाडी घातली

ठेकेदारीवरून वाळूज MIDC त कंपनी सुपरवायझरवर लोखंडी रॉडचे वार!

ठेकेदारीवरून वाळूज MIDC त कंपनी सुपरवायझरवर लोखंडी रॉडचे वार!

१८ वर्षीय मुलांच्या दुचाकीला भरधाव कारने उडवले, एकाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर जखमी, फुलंब्री तालुक्‍यातील दुर्घटना

१८ वर्षीय मुलांच्या दुचाकीला भरधाव कारने उडवले, एकाचा जागीच मृत्‍यू, दुसरा गंभीर जखमी, फुलंब्री तालुक्‍यातील दुर्घटना

Recent News

रांजणगाव शेणपुंजीतून १४ वर्षांच्या मुलीला पळवले !; शेजारच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

मी एका मुलासोबत सुरतला निघालेय… त्वचेच्या उपचारासाठी छ. संभाजीनगरला आलेल्या मुलीने बसस्थानकावरूनच आईला सांगितले!

July 15, 2025
मी एका मुलासोबत सुरतला निघालेय… त्वचेच्या उपचारासाठी छ. संभाजीनगरला आलेल्या मुलीने बसस्थानकावरूनच आईला सांगितले!

४ मुलांचे गिफ्ट पदरात टाकून पतीचे दुसरे लग्‍न!; ३० वर्षीय विवाहितेची पाचोड पोलिसांत धाव

July 15, 2025
घाटीत आता कांगारू मदर केअर सेंटर; स्टरलाइट टेक्नॉलॉजी कंपनीने केले सहकार्य

घरातील जिन्यावरून पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्‍यू, छ. संभाजीनगर तालुक्‍यातील घटना

July 15, 2025
चोरांनी देवालाही नाही सोडले… मील कॉर्नरच्या घटनेत ‘नियम पाळून’ चोरी!

चोरांनी देवालाही नाही सोडले… मील कॉर्नरच्या घटनेत ‘नियम पाळून’ चोरी!

July 15, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |