नाशिक हादरले… ७ वर्षांच्या चिमुकल्या लेकीचा गळफास देत खून केला, नंतर पोलिसाने स्वतः केली आत्‍महत्‍या!

On

नाशिक (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन भावांच्या अकाली मृत्‍यूतून सावरत नाही तोच वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला… त्यानंतर वर्षभर नैराश्यात राहिलेल्या पोलिसाने आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीचा गळफास देत खून केला, नंतर स्वतः ही नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नाशिक शहरातील जेलरोडच्या शिवाजीनगरातील मॉडेल कॉलनीत घडली. स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३६) व भैरवी स्वप्निल गायकवाड […]

नाशिक (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन भावांच्या अकाली मृत्‍यूतून सावरत नाही तोच वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला… त्यानंतर वर्षभर नैराश्यात राहिलेल्या पोलिसाने आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीचा गळफास देत खून केला, नंतर स्वतः ही नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना नाशिक शहरातील जेलरोडच्या शिवाजीनगरातील मॉडेल कॉलनीत घडली. स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३६) व भैरवी स्वप्निल गायकवाड (वय ७) अशी बापलेकीचे नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षांपासून नेमणुकीला असलेले पोलिस शिपाई स्वप्निल गायकवाड काही दिवसांपासून आजारी होते. वर्षभरापूर्वी पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर मुलीचा स्वतः सांभाळ करत ते मॉडेल कॉलनीतील मंगल प्रभात सोसायटीत वृद्ध आई- वडिलांसोबत राहत होते. राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या योगमाला इमारतीत चौथ्या मजल्यावर स्वप्निल यांचा स्वतःचा फ्लॅट आहे. सध्या भाडेकरू नसल्यामुळे तो फ्लॅट रिकामा असून स्वप्निल अधूनमधून तेथे जात होते.

स्वप्निल मंगळवारी (दि. २४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मुलगी भैरवीला घेऊन त्या फ्लॅटवर गेले. सायंकाळी सहा वाजता भैरवीचा क्लास असल्याने ती आली नाही म्हणून स्वप्निलची आई हिराबाई या त्या फ्लॅटवर नातीला बघण्यासाठी गेल्या असता आतून प्रतिसाद आला नाही. मुलगा स्वप्निल हा फोनदेखील उचलत नसल्याने त्यांनी त्यांच्या मुलीची मोठी मुलगी पूनम सोमासे हिला फोन करून बोलाविले. त्या तत्काळ योगमाला इमारतीत दाखल झाल्या. दरवाजा उघडत नसल्यामुळे हिराबाई व त्यांची नात पूनम यांनी रहिवाशांच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता बापलेक समोरासमोरील भिंतीला बांधलेल्या नायलॉन दोरीद्वारे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

स्वप्निल यांचे वडील दीपक गायकवाड हे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. स्वप्निल हे २०१४ साली पोलिस दलात भरती झाला होते. पोलीस शिपाई म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षांपासून त्यांची नेमणूक होती. स्वप्निल गायकवाड यांचा सात-आठ महिन्यांपूर्वी दुचाकीने अपघात झाल्याने गंभीर दुखापत झाली होती. स्वप्निल याच्या औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च त्यावेळी लागला होता. तेव्हा उपनगर पोलिसांनी आर्थिक मदतनिधी उभारला होता. पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर स्वप्निल यांनी मुलीचा सांभाळ स्वतः करण्याची तयारी दर्शविली होती. यामुळे मुलगी भैरवी ही त्यांच्याकडेच राहत होती. यावर्षी जेलरोडच्या अभिनव शाळेत पहिलीच्या वर्गात तिचे अॅडमिशन करण्यात आले होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software