- Marathi News
- सिटी क्राईम
- रांजणगाव शेणपुंजीतील धक्कादायक घटना : वहिणीच्या सोन्यावर दिरानेच मारला डल्ला!, सराफाकडे विकण्यास आला...
रांजणगाव शेणपुंजीतील धक्कादायक घटना : वहिणीच्या सोन्यावर दिरानेच मारला डल्ला!, सराफाकडे विकण्यास आला अन् अडकला…
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथील पवननगरात भावाच्या घरातच तरुणाने चोरी केली. कपाटातील लॉकरमधून वहिणीचे १ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. मात्र सराफाकडे दागिने विकायला गेला असता सराफाने पोलिसांना कळवले अन् त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अबुजर दस्तगीर पठाण यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथील पवननगरात भावाच्या घरातच तरुणाने चोरी केली. कपाटातील लॉकरमधून वहिणीचे १ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. मात्र सराफाकडे दागिने विकायला गेला असता सराफाने पोलिसांना कळवले अन् त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या घटनेचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या पथकाने करून दिराला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले, की मेहराज दस्तगीर पठाण (वय २०) असे संशयित दिराचे नाव आहे. घरभरणीच्या कार्यक्रमासाठी सर्व नातेवाइक जमले असताना मेहराजने लॉकरमधून वहिनीचे सोन्याचे दागिने लंपास केले. दागिने विकण्यासाठी तो एका सराफा व्यापाऱ्याकडे गेला. व्यापाऱ्यास सोन्याविषयी शंका आल्यानंतर त्याने गुन्हे शाखेच्या पथकाला कळवले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार बाळू लहरे, विजय निकम, विजय भानुसे, मनोहर गिते, कृष्णा गायके, रूपाली राणे यांच्या पथकाने मेहराजला अटक केली. त्याने त्याच्याकडे चोरलेले दागिनेही मिळून आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
31 Jul 2025 09:20:14
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...