पाणी योजनेसाठी छ. संभाजीनगर मनपा हुडकोकडून ८२२ कोटींचे कर्ज घेणार, शासन गॅरंटर राहणार !

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पाणीपुरवठा प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आपल्या हिश्श्याचे ८२२ कोटी २२ लाख रुपये कर्जाने काढणार आहे. हुडकोकडून कर्ज घेतले जाणार असून, यासाठी राज्‍य शासनाने हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्‍हणजे, हमी शुल्कही सरकार माफ करणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पाणीपुरवठा प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आपल्या हिश्श्याचे ८२२ कोटी २२ लाख रुपये कर्जाने काढणार आहे. हुडकोकडून कर्ज घेतले जाणार असून, यासाठी राज्‍य शासनाने हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्‍हणजे, हमी शुल्कही सरकार माफ करणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत व नगरोत्थान अभियनांतर्गत तसेच इतर केंद्र पुरस्कृत व राज्य योजनेंतर्गत प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी स्वहिश्श्यापोटी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उभा करावा लागतो. त्यासाठी राज्यात महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत हडको या वित्तीय संस्थेकडून हे कर्ज घेण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्याचे पैसे भरण्यासाठी हुडकोकडून कर्ज घेणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...

Latest News

नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं... नवीनच... काय तर म्हणे महिला डॉक्‍टरने चिमटे घेतले!, चिकलठाण्याच्या मिनी घाटीत हे काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटीत आगळावेगळाच प्रकार समोर आला आहे. तपासताना महिला डॉक्टरने चिमटे घेतल्याचा आरोप गर्भवतीने...
दोन संतापजनक घटना : साडी खरेदीस आलेल्या विवाहितेकडे पाहून सेल्समनचे अश्लील चाळे!, पैठण गेट भागातील घटनेने तणाव; टीव्ही सेंटर भागात विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या दोन रोडरोमिओंना चोप!
पानदरिबा भागात तणाव : पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आणली नियंत्रणात, दंगा काबू पथक तैनात, नक्की काय झालं...
रेकॉर्डिंगसाठी मोबाइल ठेवून फार्मसीच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीची किरायाच्या खोलीत आत्‍महत्‍या!, छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटना
काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software