रुग्णाला घाटीत घेऊन जा, नाहीतर कोपऱ्यात फेका!; गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. केंद्रेच्या मस्तवालपणाचा कळस!! आ. बंबहीसंतापले!; म्हणाले, हा प्रकार माणुसकीच्या सीमा ओलांडणारा!‌!, नक्की काय घडलं, ज्‍याने नागरिकांत धुमसतोय संताप

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर जखमी रुग्णावर उपचार करण्यास डॉक्‍टरने टाळाटाळ केली. रुग्णाचे नातेवाइक चिडले तेव्हा त्‍यांना अरेरावी करत उद्धट वागणूक देत छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत रुग्ण नेण्यास सांगितले. दरम्‍यान, या गंभीर प्रकाराची आ. प्रशांत बंब यांनी दखल घेत जिल्हा शल्‍य […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर जखमी रुग्णावर उपचार करण्यास डॉक्‍टरने टाळाटाळ केली. रुग्णाचे नातेवाइक चिडले तेव्हा त्‍यांना अरेरावी करत उद्धट वागणूक देत छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत रुग्ण नेण्यास सांगितले. दरम्‍यान, या गंभीर प्रकाराची आ. प्रशांत बंब यांनी दखल घेत जिल्हा शल्‍य चिकित्‍सकांना पत्र लिहित या डॉक्‍टरच्या चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, जिल्हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. बंब यांच्या पत्राला किती गांभीर्याने घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्‍की काय घडलं…
या डॉक्‍टर महाशयांचं नाव विजय केंद्रे असे असून, रुग्णांच्या नातेवाइकांना कठोर वागणूक देण्यात ते कसलीही कसर सोडत नाहीत, अशा अनेक तक्रारी वारंवार समोर येत असतात. विशेष म्‍हणजे, त्‍यांना वरिष्ठ पाठिशी का घालतात, हा प्रश्न निर्माण झाला आहे. घटना १४ जूनची आहे. छत्रपती- संभाजीनगर पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ हॉटेल रॉयल पॅलेसजवळ वाहनाने हुलकावणी दिल्याने दुचाकीस्वार दाम्पत्याची दुचाकी घसरून ते जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी दाम्पत्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.

गाडी पायावर पडल्याने सायलेन्सरचे चटके बसलेले होते. मुका मार लागून पाय सुजलेले होते. त्यांना चालताही येत नव्हते. फ्रॅक्चर आहे की नाही, याची तपासणी आवश्यक असताना डॉ. विजय केंद्रे याने उपचार करून रुग्णाला लगेचच घरी नेण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी त्यांना चालताही येत नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्या, उपचार करा, अशी विनंती केली. मात्र केंद्रे याने त्‍यांना अरेरावीची भाषा करत घरी घेऊन जा किंवा घाटीत घेऊन जा, अन्यथा कोपऱ्यात फेकून द्या, असे उत्तर दिल्याने नातेवाइक संतापले. त्‍यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुदाम लगास यांच्याकडे तक्रार केली. डॉ. लगास यांच्या सांगण्यावरून महिलेला दाखल करून घेण्यात आले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.

आ. बंब संतापले…
गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराबद्दल आ. प्रशांत बंब संतापले. त्‍यांनी तातडीने दखल घेत डॉ. केंद्रेवर कारवाईसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवले. डॉ. केंद्रे याने वापरलेली भाषा केवळ उद्धट नसून, ती वैद्यकीय तत्त्वांच्या आणि माणुसकीच्या सीमाही ओलांडणारी ठरली आहे, असा उद्वेग आ. बंब यांनी पत्रात व्यक्‍त केला आहे.

यापूर्वीदेखील संबंधित डॉक्टरच्या गैरवर्तनाबाबत काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना वर्तणुकीत सुधारणा करण्याबाबत समज देण्यात आली होती. तरीही त्यांच्या वर्तनात फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-डॉ. सुदाम लगास, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय गंगापूर

उद्धट भाषा वापरून रुग्णांना अमानवी वागणूक देत रुग्णसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवेत ठेवणे योग्य नाही. अशा डॉक्टरला तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे अशी विनंती आ बंब यांच्याकडे व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करणार आहे.
-अतुल रासकर, सदस्य रुग्णकल्याण समिती

गंभीर दुखापत असूनही रुग्णाला दाखल करून न घेता घरी घेऊन जा, असा सल्ला दिला. वैद्यकीय अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतरच रुग्णाला भरती करून घेण्यात आलं. डॉक्‍टरांनी त्‍याआधी नातेवाइकांना उद्धट वागणूक देत अरेरावी केली.
-गणेश म्हैसमाळे, रुग्ण महिलेचे नातेवाइक

तर तोंडाला काळे फासू, रिपाइंचा इशारा
दरम्‍यान, ही घटना समोर आल्यानंतर रिपब्‍लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष बापू खाजेकर यांनीही वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देत डॉक्‍टरचे प्रताप सांगितले. डॉक्‍टर रुग्णांच्या नातेवाइकांना अरेरावी करतात. उपचार न करता खासगी डॉक्‍टरकडे जाण्यास सांगतात. डॉक्‍टरला समज द्यावी अन्यथा त्‍याच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही खाजेकर यांनी दिला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software