अपघातानंतर महिला-पुरुषात रस्त्यातच जुंपली!; पुरुषाने शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल, जाधववाडी सिग्‍नलजवळील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कारने स्कुटीला धडक दिल्याने स्कुटीचे नुकसान झाले. स्कुटीस्वार महिलेने जाब विचारला असता कारचालकाने शिवीगाळ केली. महिलेने सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यातच काही काळ दोघांत भांडण रंगले होते. भाग्यश्री पुरुषोत्तम आगलावे (वय ३४, रा. मयूरपार्क, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. गुरुवारी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कारने स्कुटीला धडक दिल्याने स्कुटीचे नुकसान झाले. स्कुटीस्वार महिलेने जाब विचारला असता कारचालकाने शिवीगाळ केली. महिलेने सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यातच काही काळ दोघांत भांडण रंगले होते.

भाग्यश्री पुरुषोत्तम आगलावे (वय ३४, रा. मयूरपार्क, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. गुरुवारी (१९ जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्लेझर स्कुटीला (एमएच २०, सीव्ही ९२९८) जळगाव रोडने त्या मयूर पार्क येथून प्रोझोन मॉल शेजारी असलेल्या त्यांच्या मुलीच्या ट्युशनकडे तिला घेण्यासाठी जात होत्या. पावणेसातच्या सुमारास जाधववाडी सिग्नलच्या पुढे कलावती लॉन्सजवळ आल्या असता त्यांच्या स्कुटीला समोरून राँगसाईडने आलेल्या कारने (एमएच २०, सीएस ८१७२) धडक दिली. त्यामुळे स्कुटीचे नुकसान झाले.

भाग्यश्री यांनी गाडी उभी करून कारचालकाला जाब विचारला, की तू राँगसाईडने गाडी आणून माझ्या गाडीला धडक देऊन सायलेन्सर का तोडले? गाडी नीट चालवता येत नाही का? त्यावर कारचालकाने त्यांना शिवीगाळ करून, तुला कोठे जायचे तेथे जा, माझी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दे, मी कोणाला घाबरत नाही, असे म्हणून कारचालक निघून गेला. भाग्यश्री या घाबरलेल्या असल्याने त्‍यांनी शुक्रवारी (२० जून) सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार विद्या राठोड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

Latest News

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला
अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्‍चून भरल्या जातात स्‍कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software