५०० रुपयांची दारू चढली नाही, आणखी घेऊन आले अन्‌ मग इतकी चढली की, पैसे देणाऱ्यालाच दोघे बदडत बसले..!; जाधववाडी मोंढ्याजवळील मोकळ्या मैदानातील घटना

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जाधववाडी मोंढ्याजवळील मोकळे मैदान सध्या दारूडे, अनैतिक कामे करणाऱ्यांसाठी जणू हक्‍काचे ठिकाण बनले आहे. पोलिसांचे त्‍याकडे दुर्लक्ष होत असल्याने रात्रीबेरात्री या मैदानावर दारूड्यांची वर्दळ असते. त्‍यातून हाणामाऱ्याही होतात. मोठा अनुचित प्रकार घडण्याआधी पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. गुरुवारी (१९ जून) दुपारी घडलेल्या घटनेत दोन दारूड्यांनी त्‍यांच्या तिसऱ्या साथीदाराला बेदम मारहाण […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जाधववाडी मोंढ्याजवळील मोकळे मैदान सध्या दारूडे, अनैतिक कामे करणाऱ्यांसाठी जणू हक्‍काचे ठिकाण बनले आहे. पोलिसांचे त्‍याकडे दुर्लक्ष होत असल्याने रात्रीबेरात्री या मैदानावर दारूड्यांची वर्दळ असते. त्‍यातून हाणामाऱ्याही होतात. मोठा अनुचित प्रकार घडण्याआधी पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. गुरुवारी (१९ जून) दुपारी घडलेल्या घटनेत दोन दारूड्यांनी त्‍यांच्या तिसऱ्या साथीदाराला बेदम मारहाण करून लुटले. सिडको पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन दारूड्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रविराज कृष्णा राठोड (वय २५, रा. नाईकनगर, भारतमाता कॉलनी बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी (१९ जून) सकाळी ११ च्या सुमारास तो रिक्षा घेऊन शरद टी पॉइंट येथे प्रवासी घेण्यासाठी थांबला होता. तेथे त्याच्या ओळखीचा ज्ञानेश्वर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) आला. तो रविराजला म्हणाला, की मला दारू पिण्यासाठी ५०० रुपये दे. त्यावर रविराजने त्याला ५०० रुपये दिले. त्याने त्या पैशांतून प्यासा वाईन शॉप येथून दारू विकत घेतली. त्यानंतर ज्ञानेश्वर व त्याचा मित्र निकाळजे असे परत रविराजकडे येऊन त्याच्या रिक्षात बसले. जाधववाडी मोंढ्याजवळील मोकळ्या मैदानात रिक्षा घेऊन चल, असे म्हणाले.

त्या दोघांना रिक्षात बसवून जाधववाडी मोंढ्याच्याजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात गेले असता तिघांनी दारू पिली. त्यानंतर दारू कमी पडल्याने परत एक तासाने तिघे प्यासा वाईन शॉप येथे गेले. दारू विकत घेऊन परत जाधववाडी मोंढ्याजवळील मोकळ्या मैदानात आले. तेथे ज्ञानेश्वर आणि निकाळजे या दोघांना रविराजने सांगितले, की मला दारू प्यायची नाही. त्यावर ज्ञानेश्वरने त्याला शिवीगाळ केली आणि हाताचापटाने मारहाण करून कमरेच्या बेल्टने मारहाण केली. त्याच्या खिशातील पाच हजार ३०० रुपये बळजबरीने काढून घेतले. दोघे स्कुटीवर बसून तेथून निघून गेले. अधिक तपास पोलीस अंमलदार कृष्णा बोऱ्हाडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार

Latest News

बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार बिडकीनच्या जिल्हा परिषद शाळेला टोयोटा किर्लोस्कर कंपनी देणार अत्याधुनिक रुप!; जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बिडकीन येथे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयटा किर्लोस्कर मोटर्स प्रा....
CSCN EXCLUSIVE : महाघोटाळा : छ. संभाजीनगरच्या ४ प्रसिद्ध महाविद्यालयांनी लावला सरकारला साडेसहा कोटींचा चुना!; स्वयंम योजनेत दाखवले १४१६ बनावट विद्यार्थी, राज्‍यात खळबळ
पनवेल मनपाच्या अतिरिक्‍त आयुक्‍ताचा छ. संभाजीनगरमध्ये महिलेवर वारंवार बलात्‍कार!, लग्‍नाच्या आमिषाने ठेवत होता नैसर्गिक-अनैसर्गिक शरीरसंबंध, तीनदा गर्भपातही करवला
अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे बनावट फेसबुक खाते बनविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला अटक!, छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची राजस्थानमध्ये धडक
छत्रपती संभाजीनगरात थोड्याच्या पैशांसाठी चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ, क्षमतेपेक्षा जास्त खच्‍चून भरल्या जातात स्‍कूल व्हॅन, रिक्षा, पोलिसांनी केली २३३ वाहनांची तपासणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software