- Marathi News
- पॉलिटिक्स
- एकाएकी आंदोलनकर्त्यांनी फाशी घ्यायला केली सुरुवात, मध्यवर्ती बसस्थानकात उडाली खळबळ…
एकाएकी आंदोलनकर्त्यांनी फाशी घ्यायला केली सुरुवात, मध्यवर्ती बसस्थानकात उडाली खळबळ…
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकातील विविध समस्यांकडे एसटी महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेने शुक्रवारी (२० जून) प्रतिकात्मक सामुदायिक फाशी घेत आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ खळबळ उडाली होती. काय आहेत समस्या…मध्यवर्ती बसस्थानकात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी तुंबून चिखल होत आहे. रोज हजारो प्रवाशी बसस्थानकात येतात. त्यांना […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकातील विविध समस्यांकडे एसटी महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेने शुक्रवारी (२० जून) प्रतिकात्मक सामुदायिक फाशी घेत आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ खळबळ उडाली होती.
मध्यवर्ती बसस्थानकात जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी तुंबून चिखल होत आहे. रोज हजारो प्रवाशी बसस्थानकात येतात. त्यांना त्रास सहन करावा लागतो. बसेस खड्ड्यात आदळतात. बसस्थानकाचीही दयनीय अवस्था झाली असून, छताच्या प्लास्टरच्या खपल्या निघत आहेत. त्या प्रवाशांच्या अंगावर पडून कुणी जखमी होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून खपल्या निघत असलेले प्लास्टर काढून टाकले जात आहे. एकेकाही महाराष्ट्रात अव्वल असलेल्या बसस्थानकाची दुर्दशा झाली आहे. देश-विदेशातील पर्यटक बसस्थानकात येतात तेव्हा नाक मुरडतात.
एसटी महामंडळाचे अधिकारी प्रवाशांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना समस्यांबद्दल सांगितले. मात्र तरीही दखल न घेतल्याने अखेर मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे, बबन साठे, अजय बनसोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बसस्थानक आवारात प्रतिकात्मक फाशी आंदोलन केले. त्यामुळे सर्वांच्याच काळजात काही काही धस्स झाले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...