- Marathi News
- सिटी क्राईम
- २९ जूनला लग्न असलेली २० वर्षीय तरुणी घरातून पैसे घेऊन बेपत्ता, छ. संभाजीनगरच्या घटनेने खळबळ, ४ दिवस...
२९ जूनला लग्न असलेली २० वर्षीय तरुणी घरातून पैसे घेऊन बेपत्ता, छ. संभाजीनगरच्या घटनेने खळबळ, ४ दिवसांत छ. संभाजीनगरातून २५ तरुणी बेपत्ता
On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २९ जूनला लग्न असलेली २० वर्षांची तरुणी मंगळवारी (२० जून) घरातून पैशांसह गायब झाली आहे. या घटनेने नायगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे खळबळ उडाली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १० जूनपासून आज, १४ जूनच्या सकाळपर्यंत एकूण २५ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. फुलंब्री पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने तक्रार दिली आहे. नायगावमध्ये […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २९ जूनला लग्न असलेली २० वर्षांची तरुणी मंगळवारी (२० जून) घरातून पैशांसह गायब झाली आहे. या घटनेने नायगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे खळबळ उडाली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १० जूनपासून आज, १४ जूनच्या सकाळपर्यंत एकूण २५ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत.
चिकलठाणा परिसरातील सारा वाटिका येथून २० वर्षीय तरुणी, पिसादेवीतील २४ वर्षीय तरुणी, शेंद्रा एमआयडीसीतून १९ वर्षीय तरुणी, आंबेडकरनगरातून २० वर्षीय तरुणी, राजनगर मुकुंदवाडीतून ४५ वर्षीय महिला, भीमनगरातून ३५ वर्षीय महिला, भवानीनगरातून १८ वर्षीय तरुणी, रांजणगाव शेणपुंजीच्या श्रीरामनगरातून २१ वर्षीय तरुणी, पंढरपूरच्या फुलेनगरातून २७ वर्षीय तरुणी, घाणेगावमधून ३२ वर्षीय महिला, रांजणगाव शेणपुंजीच्या कृष्णानगरातून १९ वर्षीय तरुणी, बेगमपुऱ्यातील बीबी का मकबरा क्वार्टरमधून २८ वर्षीय महिला, जयभवानीनगर तिरुपती कॉलनीतून १६ वर्षीय मुलगी, जटवाडा रोड राधास्वामी कॉलनीतून २३ वर्षीय तरुणी, वाळूजच्या बकवालनगरातून २१ वर्षीय तरुणी, सातारा परिसरातील सूर्यदीपनगरातून ५४ वर्षीय महिला, सिडको बसस्थानकावरून २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातून ९ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यात नायगावच्या तरुणीसह सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील बाजारपट्ट्यातील रहिवासी १८ वर्षीय तरुणी, सिल्लोड बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहिता चिमुकल्या मुलासह बेपत्ता झाली आहे. ढोरेगावमधून ३८ वर्षीय महिला (पोलीस ठाणे गंगापूर), कन्नड तालुक्यातील वासडी येथून २० वर्षीय तरुणी, पैठणच्या गौतमनगरातून १८ वर्षीय मुलगी, वैजापूरच्या फुलेवाडी रोड भागातून १८ वर्षीय तरुणी, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथून २७ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
30 Jul 2025 20:45:05
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...