वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतात काम करत असलेल्या महिलेला मागून येत मिठीत मारत अश्लील चाळे केल्याची खळबळजनक घटना वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे शनिवारी (७ जून) दुपारी चारच्या सुमारास घडली. शिऊर पोलिसांनी ४० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पांडुरंग मुरलीधर कोकाटे (रा. लोणी खुर्द) असे संशयिताचे नाव आहे. लोणी खुर्द शिवारातील शेतात ४० वर्षीय महिला शेतात एकटी काम करत होती. तिला एकटी असल्याचे पाहून कोकाटे तेथे आला व मिठीत मारत अश्लील चाळे सुरू केले. अचानक बेतलेल्या या प्रसंगाने महिलेने घाबरून आरडाओरडा सुरू केली असता त्याने तिला मारहाण केली. तिने जोरदार प्रतिकार सुरू केला. अखेर कोकाटेने तिथून पळ काढला. महिलेच्या तक्रारीवरून कोकाटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विजय भिल्ल करत आहेत.