छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (मसिआ) औद्योगिक एक्स्पोचे आयोजन जानेवारी २०२६ मध्ये केले आहे. एक्स्पोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय संरक्षण मंत्री, उद्योगमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ‘मसिआ’चे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गायकवाड यांनी सांगितले, की एक्स्पोमध्ये १४०० स्टॉल्स असणार आहे. यात विदेशातील मोठ्या कंपन्यांचे सुमारे १०० स्टॉल्स असतील. शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या कार्यालयाजवळील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या ५७ एकर जागेत एक्स्पो होईल. २७ मेपासून एक्स्पोसाठी बुकिंग सुरू झाली असून, आजपर्यंत ४८० स्टॉल्सची बुकिंग विविध कंपन्यांनी केल्याची माहितीही त्यांनी दिली.