वरिष्ठ पत्रकार मनोज सांगळे यांजकडून साभार… AI म्हणजे मानवासारखी निर्णयक्षमता असलेली बुद्धिमान संगणकीय यंत्रणा. हे तंत्रज्ञान जगभरातील उद्योग, सेवा, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवत आहे. परंतु या प्रगतीच्या सोबत एक मोठा प्रश्न उभा आहे “AI मुळे माणसाच्या नोकऱ्या जातील का?’
AI आता फक्त रोबोटिक्सपर्यंत मर्यादित राहिलेले नाही. बँकांमध्ये कागदांची तपासणी, दुकानदारासाठी ग्राहकांच्या आवडीनुसार शिफारसी, किंवा कारखान्यांमध्ये स्वयंचलित यंत्रे ही सर्व कामे AI स्वयंचलितपणे पार पाडत आहे. AI ही नोकऱ्यांची संपूर्ण नाश करणारी नसून, नोकऱ्यांचे स्वरूप बदलणारी शक्ती आहे. काही पारंपरिक नोकऱ्या कालबाह्य होतील, पण त्याचवेळी नव्या संधीही उघडतील. त्यामुळे AIला भीतीने नाही, तर तयारीने सामोरे गेले पाहिजे. भविष्यात टिकून राहायचं असेल, तर बदल स्वीकारावा लागेल. मानवाच्या बुद्धीची नक्कल करणारी, स्वयंचलितपणे शिकणारी आणि निर्णय घेणारी यंत्रणा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI). पूर्वी विज्ञानकथांमध्ये वाचलेली कल्पना आज प्रत्यक्षात जग बदलणारी शक्ती बनली आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, वाहतूक, आणि अगदी आपल्या रोजच्या जीवनातही AI मोठी भूमिका बजावत आहे.

AI म्हणजे अशी संगणकीय प्रणाली किंवा यंत्रणा जी मानवासारखी शिकते, निर्णय घेते, समस्या सोडवते आणि कामे पार पाडते. AI ही “डेटा”वर आधारित तंत्रज्ञान आहे. यामध्ये मशीनला प्रचंड प्रमाणात माहिती दिली जाते, त्यावर प्रशिक्षण (training) दिले जाते आणि मग ती यंत्रणा विशिष्ट कामासाठी वापरली जाते. AI म्हणजे केवळ संगणक नव्हे, तर ही एक बुद्धिमत्ता आहे जी मानवाला मदतीसाठी विकसित केली आहे. मात्र ती वापरताना योग्य नियम, नैतिकता आणि मर्यादा यांचे भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे. आजची पिढी ही AI सह जगणारी पिढी आहे, त्यामुळे AI चा समज, जबाबदारी आणि योग्य उपयोग ही काळाची गरज आहे.
AIमुळे नोकऱ्या जातात का?
हो, कारण…
-काही साधी, पुनरावृत्तीची कामे आता यंत्रे करतात.
-मोठ्या कंपन्या श्रमबचतीसाठी AIचा वापर करतात.
नाही, कारण…
-AI माणसाच्या भावना, सहानुभूती, सर्जनशीलता यांची नक्कल करू शकत नाही.
-अनेक नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होत आहेत.
-AI सहाय्यक ठरू शकतो, पर्याय नव्हे.

भविष्यासाठी तयारी कशी करावी?
नवीन कौशल्ये आत्मसात करा : कोडिंग, डेटा अॅनालिटिक्स, डिजिटलीकरणाचे ज्ञान.
AI सह कार्य करण्याची तयारी ठेवा : AI सॉफ्टवेअरसोबत काम कसे करायचे हे शिका.
उद्योजकता विचार करा : नवीन समस्या, नवीन उपाय, म्हणजे नवीन व्यवसाय

AI चे प्रकार:
Narrow AI – ठराविक कामासाठी (उदा. सिरी, गूगल असिस्टंट)
General AI – मानवी बुद्धिमत्तेसारखी सर्वसामान्य कामे करू शकणारी (सध्या विकसित होण्याच्या प्रक्रियेत)
Super AI – मानवी बुद्धीपेक्षा जास्त प्रगत (भविष्यातील शक्यता)

AI चे फायदे आणि तोटे
फायदे : वेळ व श्रम वाचतो, अचूक निर्णय, मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषण शक्य, 24×7 सेवा.
तोटे : नोकऱ्यांवर परिणाम, चुकीच्या निर्णयाचा धोका, गोपनीयतेचा प्रश्न.
भविष्यातील शक्यता
AI + Robotics = मानवासारखे यंत्रमानव
AI + Healthcare = कॅन्सरसारख्या आजारांचे सुरुवातीला निदान
AI + शिक्षण = प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिकवणारी प्रणाली
AI + सुरक्षा = चेहरा ओळखणारे कॅमेरे, दहशतवाद प्रतिबंध