Saturday, June 21, 2025
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
No Result
View All Result
No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू
Home एक्‍सक्‍लुझिव्‍ह

जागतिक पर्यावरण दिन विशेष स्टोरी : फुलंब्रीचे ‘पोफळा’ गाव ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम!; एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीचा पुढाकार, अवघे गाव आता सौरऊर्जेद्वारे विजेची गरज भागवते!!

जागतिक पर्यावरण दिन विशेष स्टोरी : फुलंब्रीचे ‘पोफळा’ गाव ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम!; एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीचा पुढाकार, अवघे गाव आता सौरऊर्जेद्वारे विजेची गरज भागवते!!
बातमी फेसबुकवर शेअर कराबातमी X वर शेअर कराबातमी मित्राला व्हॉट्‌स ॲप करा

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम शून्य कार्बन उत्सर्जन हाही आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक होणे आवश्यक आहे. शासन त्यास चालना देत आहेच. या संकल्पनेचे महत्त्व जाणून आजच कृतिशील पावले उचलणाऱ्या संस्थाही आहेत. त्यापैकीच एक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. या संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करून फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव संपूर्ण सौरग्राम केले आहे. संपूर्ण गाव सौर ऊर्जाद्वारे आपली विजेची गरज भागवीत आहे. असे हे मराठवाड्यातील पहिलेच गाव ठरले आहे.

पोफळा हे तसे लहानसे पण जरासे न्यारे गाव. गावात अवघा ७७ उंबरठे. एन्ड्युरन्स टेक्नॉलीजी या कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे गाव संपूर्ण सौर ऊर्जेवर आणण्याचे ठरवले. त्यासाठी महावितरणने त्यांना सहयोग दिला. महावितरणने या गावाचा अधिभार नियमित करण्यासाठी १०० केव्हीचे रोहित्र बसवून दिले. त्यामुळे वीजपुरवठा पूर्णवेळ सुरू राहू शकतो. गावाने एक होऊन संपूर्ण वीज चोरी बंद केली. त्यानंतर ग्रीड पुरवठा पद्धतीने प्रत्येक घरावर १ केव्ही क्षमतेचे सौर पॅनेल बसविण्यात आले. त्यासाठी प्रति पॅनेल, फिटींग, मिटर बसविणे असा प्रत्येक कुटुंबासाठी ५१ हजार रुपयांचा खर्च कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केला. एप्रिल महिन्यापासून संपूर्ण गाव हे सौर ऊर्जेवर शिफ्ट झाले, अशी माहिती एन्ड्युरन्सच्या सामाजिक उपक्रम विभागाचे सहायक व्यवस्थापक उदय दुधगावकर यांनी दिली.

या शिवाय गावातील शाळा, जलसंधारण, वृक्ष लागवड अशी इतर कामेही या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून झाली आहेत. संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर आल्यामुळे गावातील वीज चोरी पूर्ण बंद झाली. सर्व जोडण्या वैध झाल्या. शिवाय प्रत्येक सौर पॅनेल सोबत घरावर वीज अटकाव यंत्रे, अर्थिंगही लावण्यात आली. त्यामुळे सुरक्षितता आपोआप वाढली. संपूर्ण सौरग्राम झालेले पोफळा हे गाव संपूर्ण मराठवाडा विभागातील पहिलेच गाव ठरले आहे,असा दुजोरा महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिला आहे. आता हीच कंपनी येत्या वर्षात म्हणजेच सन २०२५-२६ मध्ये मुंबापूरवाडी (ता. खुलताबाद) या गावाला संपूर्ण सौर ऊर्जेवर आणण्यासाठी काम करीत आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे १२ हजार ७२५ कृषीपंपांना दिवसा वीज
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून १२ हजार ७२५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे, अशी माहिती महावितरणकडून प्राप्त झाली आहे. ‘महावितरण’ ने दिलेल्या आकडेवारीनुसार, वैजापूर तालुक्यातील लोणी येथील १० मेगावॅटच्या प्रकल्पातून लोणी, वाकला, चिकटगाव, नायगव्हाण, खरज, तलवाडा व बाभूळगावातील १६६५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथे ५ मेगावॅट प्रकल्पातून गेवराई गुंगी, रिधोरा देवी, कोलते टाकळी, धानोरा व निमखेडा गावातील ८५४ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील अन्वी उपकेंद्रांतर्गत रहिमाबाद येथील ५ मेगावॅट प्रकल्पातून रहिमाबाद व आसडीतील ९०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव उपकेंद्रांअंतर्गत जोडवाडीतील ४ मेगावॅटच्या प्रकल्पातून १ हजार शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत आहे. वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील ४ मेगावॅट प्रकल्पातून भायगाव गंगा, उंदीरवाडी, राजुरा, पाशापूर, राहेगाव, सोनवाडीच्या ५३७ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील ४ मेगावॅट प्रकल्पातून मंगरूळ, चांदापूर व पालोदच्या ८५० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. धोंदलगाव (ता.वैजापूर) प्रकल्पातून धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. वरखेडी (ता. फुलंब्री) प्रकल्पातून आळंद व बोरगावमधील ६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक येथील ५ मेगावॅट प्रकल्पातूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. जिल्ह्यात एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प येत्या मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

शिळा भात खाल्ल्याने सहा बालकांसह महिलेला विषबाधा!; गंगापूरची घटना

Next Post

अजिंठा लेणी पहायला जाणे टाळावे का? मधमाशांचे हल्ले वाढलेत, पुण्याच्या ५० पर्यटकांना चावे, पळताना एकाचा हात मोडला!

Next Post
अजिंठा लेणी पहायला जाणे टाळावे का? मधमाशांचे हल्ले वाढलेत, पुण्याच्या ५० पर्यटकांना चावे, पळताना एकाचा हात मोडला!

अजिंठा लेणी पहायला जाणे टाळावे का? मधमाशांचे हल्ले वाढलेत, पुण्याच्या ५० पर्यटकांना चावे, पळताना एकाचा हात मोडला!

मोठी बातमी : अंधारात १० तलवारी घेऊन थांबलेल्या २३ वर्षीय तरुणावर पोलिसांची झडप!; करमाड पोलीस ठाणे हद्दीत LCB ची कारवाई

मोठी बातमी : अंधारात १० तलवारी घेऊन थांबलेल्या २३ वर्षीय तरुणावर पोलिसांची झडप!; करमाड पोलीस ठाणे हद्दीत LCB ची कारवाई

नांगरणी करताना ट्रॅक्‍टर कठडे नसलेल्या विहिरीत कोसळले, चालकाचा मृत्‍यू, वैजापूरची दुर्दैवी घटना

नांगरणी करताना ट्रॅक्‍टर कठडे नसलेल्या विहिरीत कोसळले, चालकाचा मृत्‍यू, वैजापूरची दुर्दैवी घटना

Recent News

लग्‍न ठरल्याने प्रियकरासोबत तरुणीची बोलचाल बंद, त्‍याने तिचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत होते शरीरसंबंध

लग्‍न ठरल्याने प्रियकरासोबत तरुणीची बोलचाल बंद, त्‍याने तिचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, ती अल्पवयीन असल्यापासून दोघांत होते शरीरसंबंध

June 20, 2025
हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याची मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत!, छ. संभाजीनगरात आजपर्यंत ६० हजार वाहनांनाच नंबर प्लेट

June 20, 2025
लाडसावंगीत ४ दुकाने फोडली, पण चोरी काही नाही गेले…व्यापारी असं पोलिसांना का म्हणाले…

लाडसावंगीत ४ दुकाने फोडली, पण चोरी काही नाही गेले…व्यापारी असं पोलिसांना का म्हणाले…

June 20, 2025
५ सोप्या पद्धती… विजेच्या वेगाने चालेल मोबाइल इंटरनेट

५ सोप्या पद्धती… विजेच्या वेगाने चालेल मोबाइल इंटरनेट

June 20, 2025
छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूज

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |

Contact us : cscndesk@gmail.com

  • About us
  • Privacy policy
  • Disclaimer policy
  • Contact us

Follow Us

मजकूर कॉपी केल्यापेक्षा ही बातमी जशीच्या तशी शेअर करा. धन्यवाद - आयटी टीम, CSCN

No Result
View All Result
  • होम
  • सिटी हेडलाइन्स
  • पॉलिटिक्‍स
  • सिटी क्राईम
  • एक्‍सक्‍लुझिव्‍ह
  • उद्योग-व्यवसाय
  • सिटी डायरी
  • जिल्हा न्‍यूज
  • फिचर्स
  • एंटरटेनमेंट
  • राज्‍य-राष्ट्र स्‍पेशल
  • स्‍पेशल इंटरव्ह्यू

© 2024 Chhatrapati Sambhajinagar City News |