सिडको बसस्थानकात लालपरी झुलत झुलत आली… ‘पिऊन’ प्रवाशांना आणल्याने गुन्हा दाखल!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको बसस्थानकात दाखल झालेल्या एसटी बसचालकाने दारू प्राशन केलेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बस वर्धा डेपोची आहे. चालकाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (२९ मे) दुपारी दोनच्या सुमारास घडला. ओमकार श्रावण धोंगडी (वय ४३, ह.मु. बोरगाव मेगे, जि. वर्धा) असे या चालकाचे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको बसस्थानकात दाखल झालेल्या एसटी बसचालकाने दारू प्राशन केलेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बस वर्धा डेपोची आहे. चालकाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (२९ मे) दुपारी दोनच्या सुमारास घडला.

ओमकार श्रावण धोंगडी (वय ४३, ह.मु. बोरगाव मेगे, जि. वर्धा) असे या चालकाचे नाव आहे. तो वर्ध्याहून एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ४४०७) सिडको बसस्थानकात घेऊन आला. नियंत्रण कक्षात येताच सिडको आगाराच्या वाहतूक निरीक्षक मंजूषा माने यांना उग्र वास आला. त्यांनी लगेचच सिडको एमआयडीसी पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्यात त्याने मद्यपान केल्याचे समोर आले. प्रवाशांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी असताना त्याने दारू पिलेली आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

खबरें और भी हैं

बोगस ॲप डाऊनलोड केल्याने मेडिकल व्यावसायिकाचे गेले ९ लाख!, भामट्यांनी लोनही उचलले!!, छावणीतील धक्कादायक प्रकार

Latest News

बोगस ॲप डाऊनलोड केल्याने मेडिकल व्यावसायिकाचे गेले ९ लाख!, भामट्यांनी लोनही उचलले!!, छावणीतील धक्कादायक प्रकार बोगस ॲप डाऊनलोड केल्याने मेडिकल व्यावसायिकाचे गेले ९ लाख!, भामट्यांनी लोनही उचलले!!, छावणीतील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आरटीओ चालान नावाचे बोगस ॲप डाऊनलोड केल्यामुळे छावणीतील एका मेडिकल व्यावसायिकाला ९ लाख रुपये बँक...
खळबळजनक : १३ ग्रामपंचायतींचे ७५ लाख खासगी ऑपरेटरने हडपले ;  वैजापूर तालुक्‍यातील धक्कादायक प्रकार, विस्तार अधिकारी, ग्रा.पं. अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
वैजापूरचा लाचखोर कृषी सहायक जगदीश गवळी ACB च्या जाळ्यात!
श्रावणात खुलताबाद, वेरूळमार्गे वाहन नेणार असाल तर आधी ही बातमी वाचा...
घृष्णेश्वराला फक्‍त बेलपत्र अन्‌ धोत्रा फुलेच वाहता येणार, परिसरात अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर होणार कारवाई!; भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध; जिल्हाधिकारी स्वामी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software