छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यातील लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रम घेण्यात आला. यात जिल्ह्यातील १३० लघु उद्योजकांनी सहभाग घेतला.
देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पार पडले. दी आसरा फाउंडेशनचे यासाठी सहकार्य लाभले. फाउंडेशनचे स्नेहा नन्नावरे, प्रकाश आगाशे, उद्योजक शिवप्रसाद जाजू, डॉ. आनंद गोडसे, आशीष गर्दे यांनी मार्गदर्शन केले. विशेष कार्य अधिकारी कृष्णा कांगुले उपस्थित होते. याठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, माविम, अपंग व वित्त विकास महामंडळ आदी महामंडळांचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविक उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी केले. आभार सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सुरेश बहुरे, योगेश उगले, शालिक चौधर, विरेंद्र चव्हाण, गजानन खोकड, रामदास फुले, नागेश मिटकरी, प्रीतम सोनवणे, आदित्य चोपडे आदींनी परिश्रम घेतले.